शेतीच्या बांधावर सहसा पेरणी करीत नाही. परंतु शेताच्या या मोकळ्या जागेवर वाशिम जिल्ह्यामधील इंझोरी येथील अजय ढोक या प्रयोगशील शेतकऱ्याने प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या पैशातून बांधावर लिंबूची लागवड केली.
अजय ढोक यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी झालेला आहे. लिंबू फळापासून उत्पन्न मिळण्याबरोबरच शेतीला नैसर्गिक काटेरी कुंपण मिळत आहे .प्राण्यांपासून संरक्षण होत आहे हा यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी आसपासचे शेतकरी तिथे येत आहेत.
काटेरी वृक्षामुळे शेतीचे ही वन्य प्राण्यांपासून संरक्षण
सतत होणाऱ्या झाडांच्या तोडणीमुळे वन्यजीव आणि मानवी संघर्ष वाढला आहे पीक बहरात येताच प्राण्यांचा कळप पीक उध्वस्त करायला शेतात येत असतो .अनेक वेळा पिकाचे रक्षण करण्यासाठी शेताला कुंपण लावावे लागते, व ते शेतकऱ्यांना परवडत नसते. त्यामुळे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थी असलेल्या अजय ढोक यांनी आपल्या पाच एकर शेतीच्या बांधावर 110 लिंबांची झाडे लावले आहेत. लागवडीच्या दोन वर्षानंतर या झाडांना फळ येत असून लिंबाच्या विक्रीतून त्यांना आर्थिक उत्पन्न देखील मिळत आहे .लावलेल्या लिंबाच्या काटेरी झाडांमुळे वन्य प्राण्यांपासून पिकाचे रक्षण होते.
नाविन्यपूर्ण प्रयोगासाठी त्यांचं विविध पुरस्कारांनी गौरवही झाला आहे
अजय ढोक वाशीम जिल्हयातील इंझोरी येथील असून त्यांच्या शेतीमध्ये ते नवीन नवीन प्रयोग करत आहेत. विशेष म्हणजे या नवीन नवीन प्रयोगामुळे त्यांना विविध पुरस्कारांनी ही देखील गौरवले आहे. अजय ढोक आणि त्यांच्या पत्नी पूजा ढोक हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. त्यांनी तीळ पेरणीसाठी तयार केलेले पेरणी यंत्र तसेच खपली गव्हाचे पीक त्यांनी त्यांच्या शेतामध्ये घेतलेले आहे.
कुंपणा बरोबरच बाराही महिने उत्पन्नाचा पर्याय शोधला.
तसेच वर्षभर मोकळे असणारे शेतालगतच्या मोकळ्या जागेवर त्यांनी लिंबाची लागवड करून ती यशस्वी केलेली आहे. तसेच नैसर्गिक कुंपणा बरोबरच बाराही महिने उत्पादनाचा पर्याय त्यांनी शोधून काढला आहे. त्यांचा हा प्रयोग राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच उपयुक्त आहे .व सर्व स्तरावर अजय ढोक यांच्या प्रयोगतेचे कौतुक केले जात आहे.
.