गुलटेकडी मधील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड मध्ये तरकारी भाजीपाल्याची किरकोळ विक्री बंद करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने घेतलेला आहे. यामुळे याची चर्चा सर्वत्र सुरू आहे .
मार्केट यार्ड मधील फळे भाजीपाला विभागातील गाळे शेतीमालाच्या ठोक व्यवसायासाठी दिले आहेत . गाळ्यावर आवक झालेल्या शेतमालाची दुबार विक्री करू नये असे परिपत्रक प्रशासनाने काढले आहे .
मार्केट यार्ड मधील घाऊक बाजारात खरेदीसाठी किरकोळ बाजारातील विक्रेत्यांना बाजार समितीकडे नोंदणी करून परवाना घेणे आवश्यक आहे. परंतु मार्केट यार्ड मध्ये नागरिक मोठ्या संख्येने भाजीपाला तरकारी कांदा बटाट्याची किरकोळ खरेदीसाठी येत असतात .
विशेष म्हणजे रविवारी सुट्टीच्या दिवशी मार्केट यार्ड खरेदीसाठी भरपूर गर्दी असते गाळ्यांच्या पुढे डबी अडत्यांकडून नागरिकांना शेतमाल विकला जातो डबी आडते परवानाधारक अडत्यांकडून शेतमाल खरेदी करतात व बाजारात त्याची विक्री करतात. या प्रकरणाला आता बंदी घातल्यामुळे डबी अडत्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे हा बाजार समितीचे सभापती आणि सचिव यांनी हा आदेश काढलेला आहे.
मार्केट यार्ड मधील गाळ्यांसमोर डबी अडत्यांकडून शेतमालाची किरकोळ विक्री केली जाते, परंतु आता त्या पार्श्वभूमीवर फळे भाजीपाला विभागात आलेल्या शेतमाल प्रथमता गाळ्यावर उतरून घ्यावा.