![ग्रामीण भागातील मुलींना शाळा-महाविद्यालयातच मिळणार आता एसटी बसचा मोफत प्रवासी पास...](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/06/ग्रामीण-भागातील-मुलींना-शाळा-महाविद्यालयातच-मिळणार-आता-एसटी-बसचा-मोफत-प्रवासी-पास.webp)
ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी चालना मिळावी त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने पाचवी ते बारावी पर्यंतच्या मुलींना एसटी बस मधून मोफत प्रवास करण्याचा निर्णय यापूर्वी झालेला आहे. शाळेतील प्रत्येक मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील मुलींची यादी संबंधित आगार प्रमुखांकडे द्यावी .
ज्या शाळेमध्ये मुलींची संख्या 50 ते 100 पेक्षा अधिक असेल त्या ठिकाणी संबंधित आगाराचे अधिकारी जाऊन जागेवरच पास देतील.यंदाचे शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही 15 जून पासून झालेली आहे .ग्रामीण भागातील मुलींना शाळेत ये जा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने मोफत पास देण्याची सोय उपलब्ध केली आहे .पाचवी ते बारावी पर्यंतच्या मुलींना याचा लाभ मिळत आहे.
पहिल्यासारखे आता मुलींना पास काढण्यासाठी आगारा समोरील रांगेत उभ राहण्याची गरज नाही. किंवा हेलपाटे मारण्याची गरज नाही. आता आगारातील अधिकारी मोठ्या शाळांमध्ये जाऊन मुख्याध्यापकांच्या मागणी अर्जावरून शाळेतच पास देतील. अशी सोय उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी फक्त त्या मुलीचे बोनाफाईड लागणार आहे .मुलींना तीन तीन महिन्याचे पास दिले जातील. एकदा पास काढल्यानंतर पुढील तीन महिन्यांनी पास मिळेल त्यावेळी देखील मुख्याध्यापकांचे पत्र देणे आवश्यक आहे.
कागदपत्रे काय काय लागतील आणि तक्रार कुठे करायची
ज्या शाळेत मुली शिकत आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून बोनाफाईड घेऊन एक अर्ज केल्यानंतर एसटी महामंडळाकडून संबंधित आगारातून 100% मोफत प्रवासाचा पास दिला जातो नाही अशी सुविधा उपलब्ध असून देखील कोणी अधिकारी टाळाटाळ करीत असल्यास मोबाईल क्रमांक 9021894704 या नंबर वर संपर्क साधावा असे आव्हान विभाग नियंत्रक श्री भालेराव यांनी केले आहे.
कशी मिळवायची सवलत
शाळेचे मुख्याध्यापक तसेच एखाद्या शिक्षकाच्या माध्यमातून सर्व मुलींची यादी आगर प्रमुखांकडे दिली जाईल .त्यांची शैक्षणिक कागदपत्रे पाहूनच सर्व मुलींना एसटी चे मोफत पास वाटप केले जातील. मुलींना किंवा त्यांच्या पालकांना एसटीच्या आगारात जाण्याची गरज नाही दरम्यान मोफत किंवा सवलतीचे पास देण्यासाठी प्रत्येक आगारात स्वतंत्र व्यवस्था असून सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत त्या ठिकाणी पास काढता येतील अशी माहिती विभाग नियंत्रण भालेराव यांनी यावेळी दिली.
आता हेलपाटे मारावे लागणार नाहीत
आता विभाग किंवा आगारात मुलींना किंवा त्यांच्या पालकांनाही हेलपाटे मारावे लागणार नाहीत. मुख्याध्यापकांनी पाठवलेले यादीनुसार सर्व मुलींना आता विभाग किंवा आगारात मुलींना किंवा त्यांच्या पालकांनाही हेलपाटे मारावे लागणार नाहीत मुख्याध्यापकांनी पाठवलेले यादीनुसार सर्व मुलींना पास दिले जातील. मोठ्या शाळेमध्ये आमचे अधिकारी जाऊन त्या ठिकाणी पास देतील अशी व्यवस्था देखील केली आहे.