सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यामध्ये हापूस आंबे प्रसिद्ध आहेत. याच बरोबरीने फणस, जांभूळ, कोकम ,नारळ ,आवळा ,काजू, इत्यादी पिकांची लागवड देखील मोठ्या प्रमाणात होत असते. या भागात फळ लागवडीचे बरोबरीने प्रक्रिया उद्योग देखील वाढत असतो .जमसडे विजयदुर्ग रस्त्यावर नाडन हे फळबागांनी समृद्ध असे गाव आहे. या गावातील गीतांजली वेलणकर ह्या राहतात त्यांचे पती गणेश वेलणकर, मुलगा गौरीश आणि ऋषिकेश यांच्यासोबत त्या 25 एकर शेती सांभाळतात. शेतीमध्ये दहा एकरावर हापूस आंबा बाग ,उर्वरित क्षेत्र व काजू, नारळ आणि भात शेती करतात.
फळबागेच्या बरोबरीने त्यांनी बाजारपेठेची गरज ओळखून प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली. व चांगल्या प्रकारे त्याला गती मिळाली गीतांजली यांच्या सासुबाई विनिता वेलणकर या घरगुती वापर आणि किरकोळ विक्रीसाठी अंबावडी, फणस पोळी ,आंब्याची लोणचे, अशी उत्पादने तयार करायच्या प्रक्रिया उद्योग पुढे नेण्याचा त्यांनी संकल्प केला. त्यांना माहेरी सांडगी, मिरची ,पापड कणीक, पीठ, इत्यादी प्रक्रिया उद्योगांची पहिल्यापासूनच माहिती होती. त्यामुळे पहिल्या टप्प्यात याच उत्पादकांचे निर्मितीवर त्यांनी भर दिला .उत्पादने स्वतः तयार करायचं व कुटुंबातील सदस्यांना त्याची चव उत्तम आहे .याची खात्री त्या करून घ्यायच्या व त्यानंतर उत्पादन ग्राहकांसाठी बाजारपेठेत आणायच्याचांगला दर्जा व उत्कृष्ट चव यामुळे ग्राहकांकडून प्रक्रिया उत्पादनाला मागणी वाढू लागली. गीतांजली ताईंनी 1995 पासून घरगुती स्तरावर प्रक्रिया उत्पादनात सातत्याने विविध प्रयोग सुरू ठेवले.
फळ प्रक्रिया उद्योगांवर भर
कवळे फणसाची भाजी तयार करायची भाजी बियांची भाजी पिकलेल्या फणसाची गोड गरे आवडीने खाल्ले जातात .परंतु या फणसाचा वापर आवश्यक तितकाच होत नव्हता. वटपौर्णिमेच्या वेळेस पंथाची मागणी ही कमी होत असते माणसांचे विविध उपयोग लोकांना आणखीन माहिती नसल्या कारणामुळे कोकणामध्ये दरवर्षी खूप कणस वाया जातात त्यामुळे वनस्पती प्रक्रियेवर त्यांनी लक्ष केंद्रित केले व त्यांनी फणस पोळी तळलेले गरे अशी उत्पादने तयार करण्यावर भर दिला व ग्राहकांची मागणी आणि रेडी टू इट संकल्पनेतून कोवळ्या फणसाची भाजी आणि गरे भाजी तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला.
या उद्योगाला बाजारपेठेमध्ये मागणी वाढल्यामुळे त्यांनी या उद्योगासाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी दीड लाखाची कर्ज काढले परंतु कर्ज मिळवण्यासाठी त्यांना खूप धडपड करावी लागली या प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी त्यांनी बन्सीलर लपर ड्रायर क्लब मिक्सर पॅकिंग यंत्र खवा यंत्राची खरेदी केली.
त्याचबरोबर नाही त्यांनी मैसूर येथील केंद्रीय अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान संस्थेमध्ये आठ दिवसांचे प्रशिक्षण घेतले फळांच्या हंगामानुसार उत्पादनात बदल केला जातो ग्राहकांच्या मागणीनुसार दिवाळीमध्ये चकली गणेश उत्सवात मोदक असे पदार्थ देखील त्या तयार करू लागल्या
त्यांच्याकडे दरवर्षी तीन टन कोवळा फणस भाजी एक टन तयार गरे भाजी तयार केली जाते तसेच आठ आंबा फळांवर प्रक्रिया करून क्लब लोणचे निर्मिती तयार करतात तसेच आवळ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सरबत कँडी लोणचे सुपारी इत्यादी प्रोडक्ट बनवतात मागणीनुसार परिसरातील शेतकऱ्यांना देखील आंब्यावर प्रक्रिया करून क्लब पॅकिंग करून दिला जातो त्यांच्याकडे या प्रक्रिया उद्योगांमध्ये वर्षभर 25 महिला काम करत असतात याशिवायत हंगामामध्ये आणखीन दहा ते बारा महिलांना रोजगार उपलब्ध होतो.
उत्पादनांना राज्यभर मागणी(५०० ग्रॅम)
बाजारपेठेत उत्पादनांना स्वतंत्र अशी ओळख निर्माण व्हावी यासाठी त्यांनी वनिता फूड्स ब्रँड हे नाव दिले आहे.
सुरुवातीच्या काळामध्ये त्या कुडाळ कणकवली या बाजारपेठेमध्ये त्या उत्पादनांची विक्री करत असत त्यानंतर रेल्वे स्थानकातील स्टॉलवर तसेच पुणे मुंबई कोल्हापूर नाशिक नागपूर गुजरात कर्नाटक मध्ये त्यांची उत्पादने जात असत ग्राहकांना ऑनलाइन माध्यमातून देखील घरपोच उत्पादने पाठवली जातात.
उत्पादने व त्यांचे दर खालील प्रमाणे
गरे भाजी 110 रुपये,
कोवळा फणस भाजी शंभर रुपये 175 रुपये,
आवळा लोणचे 175 रुपये ,
अंबा लोणचे 175 रुपये,
मिरची लोणचे 175 रुपये,
मॅंगो क्लब 175 रुपये,
अळूवडी 175 रुपये.
उत्पादन आणि दर (१०० ग्रॅम)
आंब्याची पोळी 85 रुपये ,
बिना साखरेची अंबा पोळी 95 रुपये रुपये,
तळलेले गरे 90 रुपये.
तळलेले मसाला घरी 95 रुपये,
याच बरोबर बेसन लाडू, नाचणीचे लाडू, मसाला ,उपवासाची भाजी, असे विविध उत्पादनांची निर्मिती करतात.