तुरीच्या साठ्यावर मर्यादा घालून देण्यात आल्याने सध्या विदर्भातील बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर हे दबावत आलेले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून दहा हजार रुपयांपेक्षा अधिक असलेले दर हे आता 9600 रुपयांवर स्थिर झालेले आहेत.
नागपूरच्या कळमना बाजार समितीत तुरीची आवक 223 क्विंटल वरून कमी होऊन 121 क्विंटल पर्यंत आली आहे. गेल्या महिन्यामध्ये तुरीच्या दराने दहा हजाराचा टप्पा पार केला होता .अमरावती बाजार समितीमध्ये तुरीला 9300 ते 9672 असा दर मिळत आहे. तर ज्वारीला 2200 ते 2350 रुपये दर मिळत आहे. तसेच गहू 2200 ते 2250, उडीद ५६००-६२५०, मुग ६३०० ते ७१५०, सोयाबीन 4700 ते 4850 ,हरभरा 4500 ते 4850,रुपये क्विंटल होता.
यवतमाळ अमरावती आणि नागपूरच्या कळमना या बाजार समितीत तिळाची आवक झाली काही बाजार समितीमध्ये ती 15 ते 20 क्विंटल इतकी झाली तिळाला दहा हजार ते दहा हजार पाचशे असा दर मिळालेला आहे अमरावती तिळाचे दर हे 11500 ते 13 हजार रुपये इतके आहेत यवतमाळला देखील 13500 ते 14500 देखील दर मिळालेला आहे वाशिम बाजार समितीमध्ये तिळाला सर्वाधिक दर म्हणजेच 14515 ते 14 हजार 700 इतका दर मिळालेला आहे याच बाजारात सोयाबीनला 4575 ते 4810 रुपये दर मिळालेला आहे
कारंजा बाजारात भुईमूग शेंगाची 170 क्विंटल ची आवक झाली असून 6410 ते 6890 रुपयांचे दर त्याला मिळालेले आहेत यवतमाळ बाजार समितीत भुईमुगाला 680 ते 695 असा दर होता अमरावती बाजारात दाखल मक्याचे व्यवहार 2000 ते 2075 रुपयांनी झाले.
मोसंबीच्या दरात घसरण कळमना बाजारात गेल्या आठवड्यात मोठ्या आकाराची मोसंबी फळाला 2500 ते 3000 रुपयांचा दर होता परंतु या आठवड्यात मोसंबीला 2000 ते 2500 एवढा दर मिळाला.