कोकण ,मध्य महाराष्ट्रात पाच जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. राज्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू असून, 24 तासात ताम्हणी घाटात 210, तर लोणावळ्यात 48 तासात 248 मिमी, पावसाची नोंद झाली आहे. अरबी समुद्रामध्ये व बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीय स्थिती तसेच राजस्थान ते मणिपूर व गुजरात ते केरळ यामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे .यामुळे संपूर्ण देशात मुसळधार पाऊस सुरू आहे.गुजरातराज्यामध्ये अतिवृष्टी सुरू असून गेल्या 24 तासात तिथे सरासरी दीडशे ते दोनशे मी पाऊस झाला आहे जुनागड येथे तब्बल 400 मिमी पावसाची नोंद झाली आहे महाराष्ट्रात घाट माथ्यावरही मुसळधार पाऊस सुरू आहे तिथे सरासरी 100 नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे
घाट माथ्यावर विक्रमी पाऊस
घाट माथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये ताम्हणी 210, शिरगाव 209 लोणावळा 48 तासात 248, वळवण 127, ठाकूरवाडी 106, भिवपुरी 129, भिरा 125 ,कोयना 81, दावंडी 144 मि. मी पावसाची नोंद झाली आहे. कोकण: ठाणे 156 ,माथेरान 185 ,खालापूर 144, शहापूर 123 ,माणगाव १२४ ,मुरबाड 120 काण कोण 113 ,विक्रमगड 115, माणगाव 108 ,अंबरनाथ 95 ,म्हाळसा 95, रत्नागिरी 94, सांताक्रुज 111 ,महाड 95 ,सांगे 97,उल्हासनगर 93, पालघर 89 ,दापोली 93 ,महाराष्ट्र ओझरखेडा 136 ,महाबळेश्वर 94, गगन बावडा 92 ,हरसुल 111 ,त्रिंबकेश्वर 65 ,इगतपुरी 73 ,शाहुवाडी 44, पुणे 20 ,नाशिक 21, राजगुरुनगर 20 ,धाराशिव 2 ,आष्टी १. मि. मी पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात जोर वाढला.
गुजरात ते केरळ पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गुजरात राज्यातील अतिवृष्टी होत आहे. त्याचाच परिणाम महाराष्ट्रात देखील दिसून येत आहे. कोकण ,मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. आता पाच जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. विदर्भ व मराठवाड्यात पावसाचा जोर कमी आहे मात्र 4 जुलैपासून त्या भागातही पाऊस वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.