देशभरात मान्सूनमुळे मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण भारतातील राज्यामध्ये 2 जुलैपासून अति मुसळधार पावसाची नवीन फेरी सुरू होणार आहे .मान्सून पुढील 48 तासांमध्ये हरियाणा, राजस्थान, पंजाबच्या उर्वरित भागात पोहोचेल .
जूनमध्ये देशभरात मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा दहा टक्के कमी झाला आहे .परंतु जुलै महिन्यामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. जुलैमध्ये सरासरीच्या 94 ते 106% पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने शुक्रवारी वर्तवली आहे. जुलैमध्ये सामान्य पावसाचे प्रमाण 280. 4मिमी आहे. शेतकरी बांधवांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. या अंदाजाच्या आधारे आता शेतकरी बांधवांना खरीप पिकाची लागवड करता येणार आहे.
या शिवाय उत्तर पश्चिम भारतातील राज्यांबद्दल बोलायचे झाले ,तर पुढील 48 तासात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे .त्याच वेळी उत्तराखंड मध्ये तीन आणि चार जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुढील 48 तासात मध्य प्रदेशात देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. पश्चिम भारतातील राज्यांमध्ये पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
याबरोबरच कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट या भागात हलका ते मध्यम पाऊस सुरू राहणार आहे. त्याचबरोबर गुजरातमध्ये पुढील 48 तासात मुसळधार पाऊस पडेल. याशिवाय पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड, मध्ये 3 जुलैला तर ओडिशामध्ये तीन आणि चार जुलैला मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.
जुलैमध्ये मान्सून सामान्य होईल.
हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी शुक्रवारी सांगितले की, जुलैमध्ये ईशान्य दक्षिण भाग, मध्य भारत, उत्तर पश्चिम भाग, सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडू शकतो .ते म्हणाले की जुलैमध्ये देशातील बहुतांश भागात किमान आणि कमाल तापमान सामान्य पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
त्याचवेळी जून महिन्यात देशात सरासरी पेक्षा दहा टक्के कमी पाऊस झाला आहे. परंतु उत्तर पश्चिम राज्यांमध्ये हे प्रमाण सामान्य पेक्षा 42 टक्के जास्त होते .याचप्रमाणे मान्सून दक्षिणेकडील राज्यांमध्ये सात ते बारा दिवसाच्या विलंबाने ईशान्येकडील राज्यांमध्ये पाच दिवसांनी पोहोचला आहे. परंतु वायव्य राज्यामध्ये तोच चार ते पाच दिवस आधीच पोहोचला आहे.
या राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
हवामान खात्यानुसार उत्तराखंडमध्ये तीन व चार जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील 48 तासांमध्ये गुजरात व मध्य प्रदेश मध्ये पावसाची शक्यता आहे. याशिवाय बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगाल ,झारखंड मध्ये देखील ३० जुलैला तसेच उडीसा मध्ये तीन ते चार जुलैला मुसळधार पावसाची शक्यता आहे.
या सोबतच कर्नाटक, तमिळनाडूमध्ये दोन ते चार जुलै, किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि रायलसीमा तीन व चार जुलै,तामिळनाडूमध्ये 3 आणि 4 जुलै रोजी अतिवृष्टी अपेक्षित आहे.