यंदाच्या वर्षी आकस्मित संकटाने शेतकरी हवाई दिल झाला आहे. उत्तर भारतामध्ये पावसाने धुमाकूळ घातला असून, राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा टिपूस ही पडला नाही .त्यामुळे अजूनही पेरणीची लगबग शेतकऱ्यांची सुरू नाही. जुलै महिना आला तरी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. आता या योजनेतून शेतकऱ्यांना या योजनेतून लवकरच लाभ होणार आहे. या योजनेतील चौदावा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांना मिळेल.
योजनेतील बदल
या योजनेमध्ये अनेक शेतकरी लाभार्थी आहेत .त्यांच्यासाठी मोठी बातमी आहे. या योजनेत आता मोठा बदल करण्यात आलेले आहे .त्याचा थेट परिणाम देशातील आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांवर होऊ शकतो. भारत सरकार लवकरच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करणार आहे. पण त्यापूर्वी या योजनेमध्ये केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे.
बोगसगिरीला बसणार चाप
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील बोगसगिरीला आळा घालण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. लाभार्थ्यांना त्यांचे स्टेटस पाहण्याची पद्धत पण पूर्णपणे बदललेली आहे .याशिवाय केंद्र सरकार पीएम किसान मोबाईल ॲप घेऊन आलेली आहे. या मोबाईल ॲपमुळे अनेक बदल झाले आहेत .लाभार्थ्यांना स्टेटस पाहण्यासाठी नोंदणी करणे व नोंदणी क्रमांकाचा वापर करणे आवश्यक आहे.
ई-केवायसी
या योजनेमध्ये बोगसगिरीला आळा घालण्यासाठी सरकारने पीएम किसान मोबाईल ॲप आणले आहे. हे मोबाईल ॲप सुरू झाल्याने बोगस लाभार्थ्यांना चाप बसेल .त्यासाठी फेस ऑथेन्टिकेशन या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे . या नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे शेतकऱ्यांना त्यांची केवायसी अगदी सहजपणे करता येते त्यांना वन टाइम पासवर्ड आणि फिंगरप्रिंट ची गरज राहणार नाही.
या दिवशी जमा होईल चौदावा हप्ता
केंद्र सरकारने आत्तापर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. शेतकरी आता पुढील हप्त्याची वाट बघत आहेत . मीडिया रिपोर्टर नुसार केंद्र सरकार 15 जुलै पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा करतील. केंद्र सरकारने याविषयी अधिकृत घोषणा अद्यापही केलेली नाही.