बहुतेक शेतकरी आपल्या शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर करत असतात. त्यामुळे जास्त उत्पादन मिळते असं काही शेतकऱ्यांचा समज आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यामुळे चांगले उत्पन्न होऊ शकते. त्यासाठी शेणखताचा वापर करावा लागतो. चांगल्या आरोग्यासाठी लोक सेंद्रिय शेतीकडे आता वळाले आहेत. सेंद्रिय शेतीतून घेतलेल्या भाज्या, फळे यांना मार्केटमध्ये चांगली मागणी असते .विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी सरकार देखील प्रोत्साहन देते. सेंद्रिय पद्धतीने शेती करून आपल्याला चांगले उत्पन्न देखील मिळते.
गाईच्या शेण आणि गोमूत्राचा वापर
उत्तर प्रदेश मधील बुलंद शहर येथील शिवकुमार यांनी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाल्याची लागवड केली आहे. ते गाईचे शेण आणि गोमूत्राचा वापर करतात.
रासायनिक कीटकनाशकांचा वापर नाही.
शिवकुमार यांनी भोपळ्याची शेती केली आहे. ती शेणखत आणि गोमूत्राचा वापर खत म्हणून करतात. रासायनिक कीटकनाशकांचा वापर करत नाहीत .त्यामुळे त्यांचा भाजीपाला लवकर खराब होत नाही. व त्याला चवही चांगली असते.
गोमूत्र बीज अंकुरल्यानंतर शिंपडतात
शिवकुमार सांगतात की गाईचे शेण व गोमूत्र चा वापर खत म्हणून केल्यास उत्पादनात वाढ होते. व सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास खर्च कमी लागतो. कोणतेही रोप लावण्यापूर्व शेणखत व गोमूत्राचा वापर केला जातो. त्यानंतर रोपटे लावतात .बीज अंकुरित झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी गोमूत्र शिंपडले जाते. त्यामुळे रोपावर कीटकांचा परिणाम होत नाही. शेणखत आणि गोमूत्र चा वापर केला जातो.