शेतकऱ्यांसाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असतात. यामध्ये शेतकऱ्यांना फायदा व्हावा हा त्यामागचा उद्देश असतो. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी सरकार जनजागृती देखील करत आहे.
आता सांगली जिल्ह्यात शासकीय अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात या वर्षात ४ हजार २०४ शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाचा लाभ घेतला आहे.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीवरून शेतकऱ्यांना 29 कोटी 67 लाखाचे अनुदान दिले आहे. केंद्राकडून यामध्ये यांत्रिक शेतीसाठी ट्रॅक्टर आणि मशागत साहित्यावर हे अनुदान दिले आहे.
यामध्ये लॉटरीच्या पद्धतीने लाभार्थी ठरवले जातात .गेल्या पाच वर्षात ट्रॅक्टर पॉवर टिलर ,साठीची मागणी दुपटीहून अधिक वाढली आहे. यामुळे अनेक जण याचा लाभ घेत आहेत. या योजनेतून ट्रॅक्टर पॉवर टिलर ,ब्लोअर पेरणी यंत्र ,नांगर, ही यंत्रे मिळत आहेत
यावर्षी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज जमा करावेत. असे आव्हान करण्यात आलेले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.