१ रुपयात पीक विमा काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात तुम्हाला माहित आहेत का ?

१ रुपयात पीक विमा काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात तुम्हाला माहित आहेत का

फक्त एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत. ते जाणून घेऊया त्याचबरोबर कोणकोणत्या पिकांसाठी ही योजना लागू आहे .हे सगळं तुम्हाला त्या अर्जामध्ये पाहायला मिळणार आहे.

केवळ एक रुपयात पिक विमा योजना.

राज्यात एक रुपयात पिक विमा योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्रातील सरकारने घेतलेला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे .ही योजना खरीप आणि रब्बी हंगामासाठी 2023 -24 ते 2025- 26 या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे.

यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते

1. पिक पेरा स्वयंघोषणापत्र.

2. सातबारा उतारा

3.आधार कार्डशी संलग्न असलेले बँकेचे पासबुक

4. सामायिक खातेदार असल्यास द्यावयाचे संमती पत्र

तुम्ही पिक विमा योजनेचा अर्ज पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की सुरुवातीला तुमचं नाव, भरावे लागेल त्यानंतर तुमचा पत्ता, जो आधार कार्ड किंवा रेशन कार्ड वरती असेल तो .त्यानंतर आठ अ उताऱ्याप्रमाणे तुमचं नाव तुमच्या नावावर असलेले एकूण क्षेत्र तिथे भरायचं आहे. अर्जामध्ये कापूस, तूर, बाजरी, मूग, उडीद, मका,सोयाबीन ही पिके आहेत.  त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर ,बँकेचे नाव शाखा ,मोबाईल नंबर, इत्यादी तुम्हाला अर्जात भरायचे आहे.

 

Leave a Reply