मंत्रालयात आता दुष्काळ नियंत्रण कक्ष सुरू होणार आहे. दुष्काळाच्या परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दुष्काळाचा आढावा घेणार आहेत .दुष्काळी भागात सापडलेल्या वस्त्या, वाड्या, गावे, तालुके, जिल्हे ,यावर या वॅार रूममधून लक्ष ठेवले जाणार आहे . तसेच वस्त्या, वाड्या ,गावे तालुके, जिल्हे हे जोडले जाणार आहेत. दुष्काळ भागासाठी उपाय योजना या रूममधून केल्या जाणार आहेत.
सरासरीपेक्षा राज्यात कमी पाऊस पडल्याने यंदा राज्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते . यामुळे राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.यंदा बहुतांश भागात तुरळकच पाऊस पडला असून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ऐन पावसाळ्यात दुष्काळाच्या झळा बसू लागल्यात.
पेरणी करुन अडीच महिने झाले तरी पण पिकांसाठी पोषक असलेल्या पावसाचा अजून पत्ताच नाही. पिके करपू लागली आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर आता संकटांचा मोठा डोंगर उभा ठाकला आहे.या पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवू नये यासाठी राज्य सरकारने मंत्रालयातील वॅार रुममध्ये दुष्काळ नियंत्रण वॅार रुम करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वॅार रुम मधून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आढावा घेतील दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेली गावे, तालुके, जिल्हे यावर नजर ठेवली जाणार आहे. दुष्काळाचे उंबरठ्यावर असलेले गाव, तालुके जिल्हे विभाग रूमची जोडले जाणार आहेत. दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेले गाव तालुके विभागीय दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.
राज्य सरकारने उचलले मोठे पाऊल
राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे यंदा राज्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते. यामुळे राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे . सरकारने दुष्काळी स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे . राज्यातील पाणीसाठा आणि स्त्रोत याचे उपलब्धतेनुसार पाण्याचे आरक्षण केले जाणार आहे.
2015 साली वॅाररुमची स्थापना
तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2015 मध्ये राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी स्थापना केली. यावर रूमच्या माध्यमातून समृद्धी महामार्ग पुण्यातील रिंग रोड किंवा विमानतळाची काम यासारख्या पन्नासहून अधिक प्रोजेक्टचा आढावा रूम मधून मुख्यमंत्र्यांनी घेतलेला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री ठाकरेंनी याची नामकरण करून संकल्प कक्ष सुरू केला. आता सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा एकदा वॉररुम हे नाव कायम ठेवण्यात आले आहे