हिंगोलीच्या गजानन माहुरें यांनी केला सहा एकरात फुलशेतीचा यशस्वी प्रयोग, आता मिळतोय लाखोंचा नफा…

फुलशेतीचा यशस्वी प्रयोग

शेतकरी आता पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती करू लागले आहेत व त्याच्यातून भरपूर प्रमाणात नफा देखील कमवू लागले आहेत . अशाच एका हिंगोलीत राहणाऱ्या शेतकऱ्याने करून दाखवलं आहे. त्या शेतकऱ्यांनी त्याच्या शेतामध्ये झेंडू ,निशिगंध ,गुलाब ,गलांडा ,कस्तुर ,या सर्व वेगवेगळ्या फुलांची लागवड केली आहे . व याच्यामधून ते भरघोस उत्पन्न काढत आहे. सुरुवातीला त्यांनी वडिलोपार्जित असलेल्या फक्त दीड एकरामध्येच या फुलांची लागवड केली होती . आता मात्र ते जवळपास सहा एकरात लागवड करतात.

फुलांची मागणी लक्षात घेऊन तीन एकर शेती भाडेतत्त्वावर त्यांनी घेतली :

सुरुवातीला माहुरे यांनी आपल्याला असलेली वडिलोपार्जित दीड एकर जमिनीत फुलांची लागवड करण्यास सुरुवात केली. ही जमीन हलकी व मध्यम स्वरूपाचे असल्यामुळे फुल शेतीतून चांगलेच उत्पन्न त्यांना निघू लागले. व त्याचा चांगला फायदा त्यांना मिळू लागला. या फुल शेतीतून झालेल्या फायद्यातून त्यांनी पुढे दीड एकर जमीन घेतली व त्यातही त्यांनी फुल शेतीची लागवड केली. तसेच फुलांची मागणी जास्त असल्यामुळे तीन एकर शेतीची लागवड देखील कमी पडू लागली होती . म्हणून त्यांनी स्वतःची तीन एकर जमीन असून देखील आणखीन तीन एकरजमीन भाडेतत्त्वावर फुल शेती करण्यासाठी घेतली.

चार ते पाच हजार दररोजचे रुपये उत्पन्न

माहुरे यांनी त्यांच्या शेतामध्ये झेंडू ,निशिगंध ,गुलाब, गलांडा, कस्टर, अशा विविध स्वरूपातील फुलांची लागवड केली. तसेच त्या जमिनीला पाणी देण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन देखील केले फुलांची तोडणी चालू झाल्यावर ते सकाळी पहाटे पाच वाजता तोडणी ला सुरुवात करतात . नांदेडच्या घाऊक बाजारपेठेत विक्रीसाठी नेतात व दररोज चार ते पाच हजार रुपये इतके उत्पन्न कमवतात प्रत्येक महिन्याला खर्च वजा करून एक लाखाच्या आसपास उत्पन्न ते कमवतात.

फुलशेतीचा यशस्वी प्रयोग

रोज चार ते पाच महिला शेतातील फुल तोडणी तसेच इतर कामासाठी गजानन माहुरे यांच्या शेतामध्ये असतात. यामुळे फुल शेतीतून रोजगार देखील उपलब्ध होत आहे. जिद्दीच्या व मेहनतीच्या बळावर गजानन माहुरे यांनी फुलशेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. त्याचा हा प्रयोग अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *