मागच्या काही दिवासांपासून राज्यात चांगला पाऊस पडत आहे. तर संपूर्ण राज्यामध्ये तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे पाझर तलाव आणि छोटी धरणे भरली आहेत. मोठ्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे ,त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.
दरम्यान, आणखीन राज्यातील अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी काळजीत आहेत. तर राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाच्या अंदाजानुसार देण्यात आली आहे. ३ दिवसांपूर्वी पश्चिम घाटासह महाराष्ट्रामध्ये झालेल्या पावसानंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरला आहे.
पुढील पाच दिवसांच्या पर्जन्यमानाचा विचार केला तर पश्चिम घाट परिसर, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे . २९ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधी मध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ,कोकणमध्ये पावसाची शक्यता कमीच आहे.
संपूर्ण मराठवाड्यामध्ये अजूनही म्हणावा तितका पाऊस झाला नाही असे शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. एकीकडे पुणे जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस होत आहे तर दुसरीकडे मात्र त्याच जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यामधील पाझर तलावही भरले नाही त्यामुळे पावसाचे असमान वितरण होत आहे असे समोर येत आहे. तसेच ,राज्यामध्ये पेरण्या पूर्ण झाल्या आहेत परंतु पश्चिम घाटातील भात लागवड अजूनही बाकी आहे. त्याचबरोबर राज्यातील अनेक शेतकर्यांनी एक रूपयांत पीक विमा या योजनेसाठी अर्ज भरला आहे.
आज (ता. २९) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथा आणि विदर्भातील अमरावती जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा ‘येलो’ अलर्ट आहे. तसेच राज्यामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.