जनावरांच्या गोठ्याचे व्यवस्थापन ,समतोल आहार ,आरोग्याची काळजी या विषयी सविस्तर माहिती..

जनावरांच्या गोठ्याचे व्यवस्थापन ,समतोल आहार ,आरोग्याची काळजी या विषयी माहिती..

पावसाळ्यापूर्वी जनावरांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटा मोठ्या प्रमाणावर ताण तणाव निर्माण करतात . काही वेळेस गंभीर नुकसान देखील होते .पावसाळ्यामध्ये जनावरांमध्ये अनेक आजारांचा प्रादुर्भाव होतो. कुपोषण किंवा काही वेळेस मृत्यू देखील ओढवतो.

पावसाळ्यामध्ये हवामानात होणाऱ्या बदलामुळे रोगप्रसार करणारे सूक्ष्मजीवांची वाढ मोठ्या प्रमाणावर होते .ज्यामुळे जनावरांमध्ये कोंबड्यांमध्ये आजार मोठ्या प्रमाणावर पसरले जातात. गोठ्याच्या आजूबाजूला जे पाणी साचलेले चर आणि बुरशीजन्य खाद्यामुळे जनावरे आजारी पडतात. पावसाळ्यामध्ये जनावरांची प्रतिकारक शक्ती ही कमी होते. दमट हवामानामुळे जिवाणू बुरशीजन्य सूक्ष्मजीवांची वाढ झपाट्याने होत असते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये बुरशीजन्य खाद्य खाल्ल्याने जनावरांना आजार होऊ शकतात पावसाळ्यामध्ये कुरणात किंवा गवताळ प्रदेशामध्ये बुरशीजन्य कीटकांची जास्त प्रमाणात वाढ होते . जनावरांवर संपूर्ण शरीरावर एलर्जी शेपटी, कास, मांडी त्वचेचे विकृती, सामान्य कोश आणि भुकेवर त्याचा परिणाम होतो. जनावरांचा गोठा, आहार व आरोग्य याची काळजी घेणे गरजेचे असते.

गोठ्याचे व्यवस्थापन

गोटा स्वच्छ नसल्यावर किंवा गोठ्याच्या आजूबाजूला घाण पाणी साचल्यामुळे अमोनिया सारख्या वायूची निर्मिती होते. त्याचाच परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होतो.

गोटा हा नेहमी स्वच्छ व कोरडा ठेवावा .योग्य वायू विजन ठेवल्याने स्वच्छ आणि कोरडा राहतो.

पावसाळ्यामधील हवामान हे प्रौढांपेक्षा लहान-वासरांना करडांना अतिशय हानिकारक असते वासरांना थंडी टाळण्यासाठी उबदार असा निवारा द्यावा.

समतोल आहार

जनावरांना गवत आणि सायलेज तंत्राद्वारे हिरव्या चाऱ्याचे योग्य नियोजन करावे

पावसाळ्यामध्ये कोरड्या चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे . यामुळे पौष्टिकतेची हानी कमी होऊ शकते.

पावसामध्ये खनिज आणि जीवन संयुक्त खाद्याची तरतूद करावी.

पावसाळ्यामध्ये खाद्यावर बुरशीचे प्रमाण पटकन वाढते. त्यामुळे पावसात चारा व पेंड साठवताना काळजी घ्यावी लागते. . तसेच या काळात चाऱ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते . असा चारा जनावरांनी खाल्ल्यामुळे काही वेळा पातळ शेण होऊ शकते. तसे होत असताना हिरवा चारा कोरड्या चाऱ्यात मिक्स करून द्यावा.

जनावरे चरायला जाण्या च्या अगोदर त्यांना पाणी पाजावे.

पावसाळ्यातील आरोग्याची काळजी

पावसाळ्यामध्ये आजाराने संक्रमित झालेल्या जनावरे चारा व पाणी दूषित करतात, व त्यामुळे इतर जनावरांना देखील त्या आजाराचा प्रसार होतो.

जनावरांना अंगावरती जर जखमा झालेल्या असतील तर त्या वेळोवेळी स्वच्छ करून त्या कपड्याने झकाव्यात. पावसाळ्यामध्ये जखमेत म्हशीच्या आळ्या वाढतात जखमेमध्ये वेळोवेळी ड्रेसिंग करावी.

पावसाळा सुरू होण्याअगोदर जनावरांमधील लसीकरण करून घ्यावे म्हशींना घटसर्प, फऱ्या या आजारांसाठी लसीकरण करून घ्यावे . मेंढ्या व शेळ्यांना पावसाळा अगोदर पीपीआर, आंत्रविषार याची लसीकरण करून घ्यावे . लसीकरण केल्यामुळे जनावरांचे अति उष्ण किंवा अति थंड वातावरणापासून बचाव होतो.

जरा जनावरांना पायथळ जागेवर चरावयास सोडू नये.

जंतांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जनावरांना जंतनाशक पाजावे जंतनाशकाची निवड, त्याचे प्रमाण आणि त्याची पद्धत ही पशुवैद्यकांच्या सल्ल्यानेच द्यावी.

उपाययोजना

संक्रमित व असंक्रमित जनावरांची वेगवेगळी बांधण्याची व्यवस्था करावी.

दूषित खाद्य व पाण्याची विल्हेवाट लावावी.

बाह्य परजीवी त्याचे नियंत्रण करण्यासाठी गोचीडनाशकाची फवारणी नियमित करावी.

चुना आणि मीठ वापरून मृत जनावरांना खोल खड्यात पुरावे.

पावसाळ्यामध्ये झाडाखाली जनावरे बांधू नका कारण वीज पडण्याचा धोका असतो . तसेच लाईटच्या खांबाला देखील जनावरांना बांधू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *