पाऊस उशिरा दाखल होण्याचे संकेत ,आफ्रिकन चातक पक्षाचे कृष्णा काठावर आगमन…

पाऊस उशिरा दाखल होण्याचे संकेत आफ्रिकन चातक पक्षाचे कृष्ण काठावर आगमन

चातक हा पक्षी काळा पांढऱ्या रंगाचा असून त्याच्या डोक्यावरचा तुरा हा एखाद्या राजकुमाराला शोभावा असा काळ्या रंगाचा तुरा असतो चातक पक्षाचा आकार हा साळुंकी एवढा असून त्याला लांब शेपटी असते. शेतकऱ्यांना पाऊस येणार असल्याची खबर ही पक्षांकडून मिळत असते . सध्या मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे, त्याचबरोबर आफ्रिकेवरून चातक हा पाहुणा देखील आज पावसाचा सांगावा घेऊन कृष्णाकाठावर दाखल झालेला आहे.

कुहू कुहू करणारी कोकिळा व पावशा शेतकऱ्यांना पेरणीसाठी सज्ज करत असते हे पक्षी नेहमी शेतकऱ्यांना पावसाच्या आगमनासाठी सज्ज करत असतात. आफ्रिकन पाहुणा यंदा उशिरा आल्यामुळे पावसाच्या आगमनामध्ये उशीर होणार असल्याचे शेतकऱ्यांनी अंदाज बांधलेला आहे . या पक्षाचा रंग हा काळा पांढरा असून त्याच्या डोक्यावर राजकुमाराला जसा तुरा असतो तसा तुरा असतो . त्याचा आकार हा साळुंकी प्रमाणे असतो . तसेच त्याला लांब शेपटी असते . शरीरावरील भाग हा काळ्या रंगाचा असतो जस कि त्याने कोट घातलाय असं वाटतं . हनवटी मान आणि पोटाचा भाग हा पांढरा रंगाचा असतो. पंखावरून रुंद असा पांढऱ्या रंगाचा पट्टा असतो . त्यामुळे आकाशात उडत असताना याला ओळखणे सोपे असते . शेपटीतील पिसांची टोके देखील त्याची पांढरी असतात . डोळे तांबडे तपकिरी ,चोच काळी असते. पाय काळसर निळे असतात. हे एकटे किंवा जोडीने आढळून येतात . चातक हा पक्षी 11 जूनला कृष्णकाठी दिसून आला. पूर्ण पावसाळा म्हणजे जून सप्टेंबर पर्यंत हा पक्षी कृष्णाकाठी असतो . कोकिळा ,कारुण्य कोकिळा , पावशा, बुलबुल, रॉबीन ,या पक्षांसोबत चाहताकाच्या सुराचीमैफिक कृष्णा काठावर रंगते हे पाहण्यासाठी थेट कृष्णाकाठ गाठावा लागेल.

कोकिळाप्रमाणे या पक्षामध्येही गृहपरजीविता दिसून येते यांचे मादी अंडी छोट्या सातभाई पक्षाच्या घरट्यात घालत असतात या पक्षांच्या अंड्याचा रंग देखील सात भाई पक्षाच्या अंड्यांप्रमाणेच आकाशी असतो सप्टेंबरच्या सुमारांमध्ये या अंड्यातून पिल्ले बाहेर निघतात त्यातील चातकाची पिल्लू हे तपकिरी रंगाचे असून त्याच्या पंखावर पिवळसर आडवा पट्टा असतो. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *