सीताफळ एक महत्वाचे पीक असून ते कोरडवाहू भागातील हलक्या ते मुरमाड जमिनीपासून हे फळपीक घेतले जाते. सिताफळाच्या अधिक उत्पादनासाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते सीताफळाला जून महिन्यात नैसर्गिक बहर येतो पाण्याची जर कमतरता नसेल तर उन्हाळ्याच्या सुरुवातीसच भर धरला जातो .उन्हाळी बहराची फुले जुलै ऑगस्ट दरम्यान काढणीस तयार होऊन चांगला दर मिळू शकतो .
विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे उन्हाळी बहराकरिता अनुकूल वातावरण तयार झालेले आहे. उलट नियमित नैसर्गिक भर घेतल्या जाणाऱ्या बागांचा ताण तुटल्यामुळे त्यांना नवीन फुट येऊन फुलधारणा झालेली आहे.
सिताफळ उत्पादकांना याबाबत द्विधा मनस्थिती झालेली आहे . सध्या तापमानामध्ये वाढ झालेली असून अनुकूल परिस्थिती अभावी फुल गळण होऊन फलधारणा होणे शक्य होत नाही. त्यामुळे मनात कोणताही संभ्रमण न ठेवता नियमितपणे नैसर्गिक बहराची तयारी करणे योग्य ठरेल.
भर व्यवस्थापनासाठी पुढील बाबींवर भर द्यावा
बहर धरताना मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाच्या अंदाजानुसार सिंचन सुविधा उपलब्धतेनुसार छाटणीची कामे करून घ्यावीत. अवकाळी पावसामुळे बागांना नवीन फूट येऊन फुलधारणा झालेली आहे . बागेची छाटणी करत असताना उर्वरित फांद्यांवरील फूट काढून टाका छाटणी करत असताना जुन्या वाळलेल्या तसेच आवश्यक नसलेल्या व दाटी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात. झाडांच्या मध्यभाग हा मोकळा राहिला पाहिजे .
अशा पद्धतीने छाटणी करून घ्यावी झाडांची उत्पादकता ही झाडांना मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाशी संबंधित असते सूर्यप्रकाश जर झाडांना कमी मिळाला तर फलधारणा देखील कमी होते छाटणीनंतर लवकरात लवकर झाडांच्या फांद्या खोडांवर एक टक्का बोर्डो मिश्रणाची (एक किलो चुना अधिक एक किलो मोरचूद प्रति १०० लिटर पाणी) फवारणी करावी.
झाडांची खोडे जमिनीपासून दोन ते अडीच फुटापर्यंत मोकळी करावी. खोडांवर दहा टक्के तीव्रतेची बोर्डो बेस्ट लावावी तसेच छाटणीमुळे झाडांची नियंत्रित वाढ होते. झाडांवर फळांची संख्या देखील मर्यादित राखता येते. फळे आकाराने मोठी होतात.
बहरात निव्वळ पावसाच्या पाण्यावर चांगले उत्पादन मिळते .पावसाचा जर खंड पडला तरच मगदरानुसार भारी जमिनीमध्ये पाच ते सहा दिवसांनी व हलक्या जमिनीत तीन ते चार दिवसांनी पाणी द्यावे ठिबक सिंचनाच्या नळ्या ह्या झाडाच्या घेरा भोवती अंथरून ठेवाव्यात झाडांना खत देऊन पाणी द्यावे ठिबक सिंचनाचा वापर करावा यापासून पाण्याची बचत होते.
बागेतील प्रत्येक झाडांना 30 ते 40 किलो शेणखत किंवा सहा किलो गांडूळ खत तसेच 125 ग्रॅम स्पर्ध अडीचशे ग्रॅम नत्र व 125 ग्रॅम पालाश अशी खत मात्र द्यावी नत्र ची मात्रा पहिल्या पाण्या वेळेस निम्मी द्यावी स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी . बहर धरण्याअगोदर बागेची स्वच्छता करून घ्यावी . त्यासाठी बागेमध्ये पडलेली पाने-फळे, झाडावर लटकलेली काळी व रोगग्रस्त फळे गोळा करून खड्यामध्ये पुरून टाकावेत.बागेची छाटणीनंतर आडवी व उभी हलकी मशागत करून घ्यावी.