Kanda RAte : मागील आठवड्यापासून नगर, माळशेज, जुन्नर या परिसरासह नाशिकमधील काही ठिकाणी उन्हाळी कांदा काढणीला सुरूवात झाली असून नगर जिल्ह्यात काढणीने वेग घेतला आहे. बाजारभाव पडले तर आपल्या कांद्याला भाव मिळणार नाही या अपेक्षेने काही शेतकरी कच्चाच कांदा बाजारात आणत असल्याचेही दिसत असून कच्चा कांदा बाजारात आणू नये असे आवाहन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधी करताना दिसत आहेत.
राज्यातील बाजारांत मागच्या दोन आठवड्यापासून थोड्या प्रमाणात होणारी उन्हाळी कांद्याची आवक या आठवड्यात वाढत चालली असून लाल कांद्याची आवक घटताना दिसत आहे. शुक्रवारी संपूर्ण राज्यात एकूण दोन लाख १० हजार क्विंटल कांदा आवक झाली.
एकट्या नगर जिल्ह्यातून शुक्रवार दिनांक २८ मार्च रोजी १३ हजार ७३१ क्विंटल उन्हाळी कांदा आवक होऊन सरासरी २२०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. तर नाशिक जिल्हयात सुमारे ३ हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होऊन सरासरी २३०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. सातारा जिल्ह्यात सात हजार क्विंटल उन्हाळी कांदा आवक होऊन सरासरी १८०० रुपयांचा दर प्रति क्विंटल मिळाला.
दरम्यान गुरूवारी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी नगर जिल्ह्यात तब्बल ३६ हजार १७६ क्विंटल कांदा उन्हाळी कांदा आवक झाली आणि सरासरी २१०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला.












