
तुम्हाला दुधपालन आणि डेअरी व्यवसायासाठी गाय विकत घ्यायची असेल, तर सध्या बाजारात गाईंच्या किंमती काय आहेत हे जाणून घ्यावे लागेल. त्यातून तुम्हाला तुमच्या गोपालन व्यवसायासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज बांधता येईल.
काल दिनांक २१ नोव्हेंबर रोजी कल्याण बाजारात संकरीत गाईचा बाजारभाव कमीत कमी ५० हजार रुपये, तर जास्तीत जास्त दर ७० हजार रुपये आहे. सरासरी दर ६० हजार रुपये आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण आठवडाभर कल्याण बाजारात गायीसाठी साधारणत: हाच दर मिळत असून सध्या दर स्थिर असल्याचे कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार समजते.
कल्याण बाजारात लोकल किंवा गावठी गाईसाठी सध्या ३५ हजार ते ४५ हजार असे दर असून सरासरी ४० हजारांना ही गाय विकत घेता येते.
जुन्नर-आळेफाटा येथील बाजारात लोकल किंवा गावठी गाईसाठी काल दिनांक २१ नो्व्हेंबर रोजी कमीत कमी १० हजार तर जास्ती जास्त ८५ हजाराचे दर होते. सरासरी एक गावठी गाय ४५ हजार रुपयांनी विकली गेली.
कालवडीला असा आहे दर
दरम्यान कल्याण बाजारात या आठवड्यात संकरित जातीच्या कालवडीसाठी १८ हजार ते २२ हजार असे दर असून सरासरी २० हजार रुपयांना कालवड खरेदी-विक्री होत आहे. लोकल किंवा गावठी जातीच्या कालवडीसाठी सरासरी १३ हजार रुपये दर असून कमीत कमी १० हजार तर जास्तीत जास्त १५ हजार असे दर आहेत.