गाय विकत घेताय? सध्या संकरीत आणि गावठी गाईच्या अशा आहेत किंमती..

तुम्हाला दुधपालन आणि डेअरी व्यवसायासाठी गाय विकत घ्यायची असेल, तर सध्या बाजारात गाईंच्या किंमती काय आहेत हे जाणून घ्यावे लागेल. त्यातून तुम्हाला तुमच्या गोपालन व्यवसायासाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज बांधता येईल. काल दिनांक २१ नोव्हेंबर रोजी कल्याण बाजारात संकरीत गाईचा बाजारभाव कमीत कमी ५० हजार रुपये, तर जास्तीत जास्त दर ७० हजार रुपये आहे. सरासरी दर […]

माळरानावरच्या फळबागेतून सुमनबाईं लखपती झाल्यात, त्याची प्रेरणादायी कहाणी..

नांदेडच्या सीमा ओलांडून भोकर तालुका लागला की लहान डोंगरांची माळ सुरू होते. भोकरच्या पायथ्याला मुदखेड-अर्धापूर तालुक्यातील जमिनीचा पोत हा केळी, ऊस, हळद व इतर फळबागांसाठी पोषक आहे. त्या तुलनेत भोकरच्या माळरानावर शेतीला फुलवणे हे तसे आव्हानात्मक आहे. भोसी येथील सौ. सुमनबाई दिगंबर गायकवाड या महिलेने आपल्या माळरानावर असलेल्या शेतीसाठी स्वप्न पाहिले. ते सुद्धा फळबाग शेतीची. […]

फक्त एका एकरात उभारा हा शेती व्यवसाय आणि कमवा लाखो, अनुदानही मिळवा..

तुमच्याकडे केवळ एक एकर जागा असेल आणि तुमची कष्ट करण्याची तयारी असेल, तर तुम्ही लाखो रुपयांचे धनी होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला एका योजनेचाही फायदा होईल. आज आपण याच योजनेबद्दल आणि व्यवसायाबद्दल जाणून घेऊ कृषि उत्पादनाच्या निर्यातवाढीसाठी नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेल्या किड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी वाढत आहे. भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न […]

तुम्ही डाळींब, संत्रा, आंबा बागायतदार आहात मग ही बातमी वाचाच, फायद्यात रहाल..

पुनर्रचित हवामान आधारित ‘फळ पीक विमा योजना’ आंबिया बहार सन 2024-25 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी या 9 फळपिकांसाठी 30 जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. मात्र त्यातील काही फळपिकांच्या विम्याची मुदत ऑक्टोबरमध्येच संपली असून सध्या काही पिकांसाठी अजूनही मुदत शिल्लक असल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर विमा नोंदणी करणे आवश्यक आहे. योजनेसाठी […]

बाजारभाव कमी मग शेतमाल साठवून शेकडो शेतकऱ्यांनी मिळवले कोट्यवधी रुपये..

राज्य कृषि पणन मंडळाच्या २०२३- २४ या संपणाऱ्या हंगामामध्ये राज्यातील ६७ बाजार समित्यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेत सहभाग घेतला. त्यामध्ये सुमारे दोन लाख ७७ हजार किंटलपेक्षा जास्त शेतमाल तारणात स्वीकारला. त्यावर एकूण ३६ कोटी ३४ लाख २४ हजार रुपयांइतक्या कर्ज वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. हंगामामध्ये बाजारभाव सर्वसाधारण समाधानकारक राहिल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेत कमी […]

मजूरांच्या समस्येमुळे राज्यात यांत्रिक ऊसतोडणीकडे वाढता कल..

सध्या महाष्ट्रात ऊस गाळप हंगाम सुरू असून अनेक ठिकाणी ऊस तोडणी जोमात सुरू आहे. बहुतेक ठिकाणी ऊस तोडणी कामगारांच्या माध्यमातून ही ऊस तोडणी होत असली, तरी अलीकडच्या काळात यांत्रिक ऊसतोडणी होताना दिसत आहे. त्यात अनेक साखर कारखान्यांनी स्वत:ची ऊसतोडणी यंत्रे घेतल्याचे दिसते. सध्या राज्यात सुमारे १ हजार ऊस तोडणी यंत्राच्या माध्यमातून ऊस तोडणी सुरू असल्याचा […]

तुमच्या मोबाईलवरूनही रब्बी पीक विमा काढा, तोही एक रुपयांत, जाणून घ्या कसे ते…

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीपानंतर आता रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा मिळणार असून त्यासाठी नोंदणी करण्याची शेवटची मुदत १५ डिसेंबर रोजी आहे. अनेक शेतकऱ्यांनी अजूनही पीक विमा काढलेला नाही. जवळच्या संगणक सेवा केंद्राच्या मदतीने पीक विमा भरता येईल किंवा आपल्या मोबाईलवरही अवघ्या काही मिनिटांत पीक विमा भरता येईल. मोबाईलवर पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना […]

मतदान संपले आणि सोयाबीनचे बाजारभाव पडले, जाणून घ्या आजचे बाजारभाव..

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी मतदारांना प्रभावित करण्यासाठी सरकारने अनेक घोषणा केल्या. त्यापैकीच एक होती हमीभावाने सोयाबीन खरेदी करणाऱ्या केंद्रांची. मतदानाच्या ऐन दोन दिवस आधी ही केंद्रे सुरू करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. त्यानंतर बाजारात सोयाबीनचे बाजारभाव वधारून ४३०० रुपयांपर्यंत गेले. मात्र आज मतदानाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २१ नोव्हेंबर रोजी बाजारातील सोयाबीनचे भाव काहीसे गडगडल्याचे दिसून […]

सोलापूरला लाल कांद्याने ओलांडला सात हजाराचा आकडा, लासलगावला काय आहेत बाजारभाव..

kanda bajarbhav

आज दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सोलापूर बाजारसमितीत लाल कांद्याची सुमारे ३७ हजार क्विंटल आवक झाली. या ठिकाणी लाल कांद्याला सरासरी अडीच हजार रुपये प्रति क्विंटल असे बाजारभाव मिळाले, कमीत कमी ५०० रुपये तर जास्तीत जास्त ७४०० रुपये बाजारभाव मिळाले. राज्यात आज लाल कांद्याला जास्तीत जास्त बाजारभाव सोलापूरमध्ये मिळाला. दरम्यान कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजारात आज […]