
आज दिनांक २१ नोव्हेंबर रोजी सोलापूर बाजारसमितीत लाल कांद्याची सुमारे ३७ हजार क्विंटल आवक झाली. या ठिकाणी लाल कांद्याला सरासरी अडीच हजार रुपये प्रति क्विंटल असे बाजारभाव मिळाले, कमीत कमी ५०० रुपये तर जास्तीत जास्त ७४०० रुपये बाजारभाव मिळाले. राज्यात आज लाल कांद्याला जास्तीत जास्त बाजारभाव सोलापूरमध्ये मिळाला.
दरम्यान कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजारात आज लाल कांद्याची ५ हजार ४०० क्विंटल आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी ११००, जास्तीत जास्त ५ हजार ४५५, तर सरासरी ४५०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव राहिले. लासलगावची उपबाजारसमिती असलेल्या विंचूर बाजारसमितीत लाल कांद्याची १८०० क्विंटल आवक झाली. सरासरी ३७०७ तर किमान १५०० रुपये बाजारभाव आज या ठिकाणी मिळाला.
पिंपळगाव बसवंत अंतर्गत सायखेडा बाजारसमितीत आज लाल कांद्याला सरासरी ३८५० रुपये प्रति क्विंटल असे बाजारभाव होते.
पुणे बाजारसमितीत लोकल कांद्याला आज सरासरी ४५०० रुपये बाजारभाव मिळाला. याठिकाणी आज सुमारे पावणे आठ हजार क्विंटल कांदा आवक झाली. कमीत कमी २५०० रुपये बाजारभाव होता.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील कळवण बाजारसमितीत आज उन्हाळी कांद्याची सर्वाधिक म्हणजेच सुमारे ४ हजार क्विंटल आवक झाली. याठिकाणी सरासरी ५४०० रुपये बाजारभाव मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत सरासरी ५७०० रुपये प्रति क्विंटल असे बाजारभाव होते. तर लासलगाव बाजारसमितीत सुमारे ५००१ रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव मिळाला.