आता १०० % अनुदानावर मिळणार बॅटरी चलित फवारणी पंप ,कुठे अर्ज करावा जाणून घ्या सविस्तर ..

बॅटरीवर चालणारा औषध फवारणी पंप खरेदी करायचा असेल तर मार्केटमध्ये यासाठी पैसे द्यावे लागतात. परंतु हाच औषध फवारणी पंप तुम्हाला शासकीय अनुदानावर मिळणार आहे .सोयाबीन ,कापूस , इत्यादी पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी शेतकरी बांधवाना फवारणी पंपाची आवश्यकता असते.शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा खरेदी करण्यासाठी अगोदरच शेतकरी बांधवांकडे पैसे नसतात परंतु औषध फवारणी करायची असेल तर पंप घ्यावाच लागतो.‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा’चा पुरवठा चालू हंगामामध्ये करण्यासाठी सन २०२४-२५ मध्ये योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे .

कापूस सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पिक पद्धतीस चालना देण्यासाठी व शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी तसेच कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीला चालना देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या उद्देशाने या तीन वर्षात राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ राबविण्यात येत आहे.

औषध फवारणी पंप शासकीय अनुदानावर खरेदी करण्यासाठी तुम्हाला पहिल्यादा ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा ऑनलाईन अर्ज https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या वेबसाईट वर जाऊन करावा लागतो .

या प्रकारे करा अर्ज

१) अर्ज करणे साठी वेबसाईट
https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

२)“युजर आयडी व पासवर्ड” लाभार्थी शेतकऱ्यांनी तयार करणे.

३) पासवर्ड आणि “युजर आयडी टाकून लॉगीन करावे .

४) अर्ज करा या ऑपशन वर क्लिक करा .

५) कृषी यांत्रिकीकरण या ऑपशनवर क्लिक करा .

६) मुख्य घटक या ऑपशनवर क्लिक करा .

७) तपशीलया ऑपशन वर क्लिक करून
-मनुष्यचलित औजारे घटक निवड
-यंत्र/औजारे व उपकरणे
-पिक संरक्षण औजारे
– बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप (कापूस किंवा सोयाबीन) बाब निवडणे.

८) जमा (जतन )करणे.

जवळील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी/उप विभागीय कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी अधिक माहितीसाठी संपर्क करावा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *