भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना ठरली फायदेशीर ! फळबाग क्षेत्रात होतेय वाढ ..

मालेगाव तालुक्यात बाजरी, कपाशी ,कांदा, मका, ही पिके घेतले जातात . तालुक्यामध्ये भौगोलिक क्षेत्राखाली १ लाख ८२ हजार ०३७ हेक्टर जमीन आहे. यामध्ये पिकाखाली क्षेत्र १ लाख ४२ हजार ८७९ एवढे क्षेत्र आहे. दिवसागणिक फळबाग क्षेत्रात वाढ या योजनेमुळे तालुक्यात होत आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना २०१८-१९ च्या खरीप हंगामापासून सुरु झाली.२०२३ ते सप्टेंबर २०२४ पर्यंत तालुक्यातील फळबाग योजनेत ३ हजार ८५० शेतकऱ्यांची निवड झाली आहे.

१६ प्रकारची फळे फळबाग योजनेत येतात. यात सीताफळ, फणस, डाळिंब, लिंबू ,आवळा, चिंच, मोसंबी, आंबा, नारळ, कोकम,जांभूळ, पेरू, चिकू, यासह अनेक फळपिके रोजगार हमी योजना व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत येत असतात.

शेतकरी राज्यात विभागानुसार फळ पिकांची निवड करतात. मालेगाव तालुक्यात सर्वात जास्त डाळिंब, चिकू, सीताफळ ,लिंबू, मोसंबी, आवळा, या फळ पिकांची लागवड केली जाते . पहिल्या वर्षी पात्र शेतकऱ्यांना पन्नास टक्के, दुसऱ्या वर्षी ३० हजार , तिसऱ्या वर्षी २० हजार असे १०० टक्के अनुदान मिळते.

सुमारे ३ हजार शेतकऱ्यांपैकी १८०० शेतकऱ्यांनी या फळबाग योजनेचा लाभ २०२३- २४ मध्ये घेतला आहे. तसेच २०२४-२५ या हंगामामध्ये सुमारे ८५० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना डाळिंब लागवडीसाठी १ लाख २० तर मोसंबी, लिंबूसाठी ७२ हजार,सिताफळसाठी ८८ हजार, पेरुसाठी ७५ हजार प्रती हेक्टरप्रमाणे अनुदान देण्यात येते .

अनेक शेतकरी या योजनेमुळे पारंपारिक शेती कडून फळबाग शेतीकडे वळताना दिसत आहेत. ३२ हजार ७५६ हेक्टरवर बागायत व फळपिके मालेगाव तालुक्यामध्ये घेतली जात आहेत. फळबाग रोपांची लागवड जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये करण्यात येते . जिल्ह्यात डाळिंबाचे पीक सुमारे ३५ ते ४० हजार हेक्टरवर घेतले जाते.

“शेतकऱ्यांनी फळबागेसाठी नोंदणी महाडीबीटी पोर्टलवर करावी. खाते उतारा, आधार, बँक पासबुक ,सातबारा उतारा नोंदणी करताना देणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांना अर्ज केल्यानंतर थेट मोबाईलवर निवड झाल्याचा मेसेज येतो . निवड झाल्यावर कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर योजनेचा लाभ मिळतो .”
– भगवान गोर्डे, तालुका कृषी अधिकारी, मालेगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *