‘पीएम किसान’च्या लाभासाठी मोहीम; धनंजय मुंडेंनी फर्मान सोडल्यावर जागा झाला कृषी विभाग पहा सविस्तर …

‘पीएम किसान’च्या लाभासाठी मोहीम; धनंजय मुंडेंनी फर्मान सोडल्यावर जागा झाला कृषी विभाग पहा सविस्तर ...

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 12 व्या हप्त्यापासून भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करण्याचे धोरण केंद्र सरकारने स्वीकारले तरीपण चौदाव्या हप्त्याचे वितरण होत असतानाही 12 लाख 33 हजार शेतकरी पी एम किसान सन्मान योजनेत वंचित राहिले.

हीच बाब लक्षात घेता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी फर्मान सोडले आणि कृषी विभाग जागा झालाय,  या योजनेतील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांचे अभिलेख नोंदी अध्यावत करणे,  ई केवायसी बँक खाते आधार कार्ड संलग्न करण्यासाठी कृषी विभागातर्फे 15 ऑगस्ट पर्यंत विशेष मोहीम राबवण्यास  सुरुवात झाली.

पंतप्रधान सन्माननिधी योजनेच्या लाभासाठीच्या पूर्ततेची जबाबदारी शेतकऱ्यांवर आहे.  परंतु शेतकऱ्यांना त्यामध्ये अडचणी येत आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांच्या पूर्ततेच्या जबाबदारीचे आव्हान कृषी विभागा च्या यंत्रणेला पेलावे लागणार आहे . सन्मान योजनेअंतर्गत राज्यामधील 1 कोटी 17 लाख 61 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.  त्यामधील 97 लाख 99 हजार शेतकरी पात्र आहेत. 

भूमि अभिलेख नोंदणी अद्ययावत करत बँक खाते संलग्न केलेल्या राज्यातील 85 लाख 66 हजार शेतकऱ्यांना चौदाव्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. परंतु या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. 95 लाख 75 हजार पोर्टलवरील  लाभार्थी नोंदी या बाराव्या हप्त्याच्या लाभावेळी  शेतकऱ्यांनी अद्ययावत केल्या होत्या.

त्यावेळी दोन लाख 24 हजार शेतकऱ्यांची नोंदी अद्यावत झाल्या नव्हत्या,  ई-केवायसी प्रमाणीकरणाचे काम 13 लाख 43 हजार शेतकऱ्यांचे करायचे आहे . कृषी विभागाने हे काम केल्यास ऑगस्ट ते नोव्हेंबर 2023 या कालावधीतील पंधराव्या हप्त्यापासून कोणीही शेतकरी वंचित राहणार नाही. 

‘एसएओं’कडून दररोज अहवाल घ्या

सध्याची ‘पीएम किसान’ व राज्याच्या नियोजित ‘नमो’ योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित राहू नये, यासाठी तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार, भूमी अभिलेख अधिकारी यांनी तालुका पातळीवर मोहीम घ्यावी, असे आदेश शासनाने दिले आहेत.

वंचित असलेल्या १२ लाख शेतकऱ्यांपर्यंत कृषिसेवक, ग्रामसेवक व तलाठ्याने जावे व त्यांना या योजनेच्या कक्षेत आणावे. या मोहिमेचा प्रगती आढावा रोज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने (एसएओ) पाठवावा, असेही सूचित करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *