समाजातील विविध घटकांचा विचार करून देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी कष्टकरी जनतेला कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना सुरू केल्या होत्या त्यापैकीच केंद्राची पीएम स्वनिधी योजना ही एक आहे या योजनेअंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांची काम सुरू करण्यासाठी तसेच वाढवण्यासाठी केंद्र सरकार दहा हजाराचे विनाकारण कर्ज देत आहे तर यानंतर 50000 पर्यंतचे विनाकारण कर्जही त्यांना घेता येणार आहे.
डिसेंबर 2024 पर्यंत घेता येणार योजनेचा लाभ
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने एक जून 2020 रोजी पंतप्रधान व निधी योजना सुरू केली होती रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांची व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी विनाकारण कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे कोरोना काळामध्ये फेरीवाल्यांची स्थिती ही आला तिची होती ती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात केली या योजनेची मुदत ही डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे
पंतप्रधान स्वनिधी योजनेचे मुख्य उद्दिष्टे खालील प्रमाणे
या योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना विनाकारण दहा हजार रुपये कर्ज घेता येणार आहे तर ते पुढेही त्यांना 50000 पर्यंत कर्ज घेता येणार आहे.
लहान व्यापारी तसेच रस्त्यावरील विक्रेत्यांना मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
घेतलेले कर्ज हे एका वर्षाच्या आत हप्त्यामध्ये फेडता येते.
डिजिटल पेमेंट वर कर्जदारांना बाराशे रुपये पर्यंत कॅशबॅक ही दिला जातो.
आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत अडीच लाखाहून अधिक अर्जदारांना कर्ज मिळाले आहे.
या योजनेची खास बाब म्हणजे एकदा कर्जाची परतफेड केल्यानंतर लाभार्थ्यांना दुसऱ्यांदा कोणत्याही व्याजाशिवाय दुप्पट रक्कम मिळू शकते या योजने अंतर्गत घेतलेल्या कर्जाची रक्कम एका वर्षाच्या कालावधीत फेडता येऊ शकते याशिवाय मासिक हप्त्यांमध्येही परतफेडीचा पर्याय उपलब्ध आहे.
नक्की काय आहे ही योजना?
पंतप्रधान स्वनिधी योजनेमध्ये केंद्र सरकार लहान व्यापारी तसेच रस्त्यावरील विक्रेत्यांना दहा हजार ते पन्नास हजार रुपयांचे विनाकारण कर्ज देते एका वर्षामध्ये जर ही रक्कम परत फेडली तर कर्जदाराला दुप्पट रक्कम कर्ज म्हणून दिले जाते डिसेंबर 2024 पर्यंत गरजू लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
पीएम स्वानिधी योजनेचा लाभ चहा विक्रेते, रस्त्यावरील फळ-भाजी विक्रेते, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते , फेरीवाले, आणि छोटे कारागीर यांना मिळू शकतो.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड ,मतदान कार्ड ,शिधापत्रिका, पासबुकची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे फोटो.
पी एम स्वनिधी योजनेसाठी अर्ज कसा कराल
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी केंद्रचे अधिकृत वेबसाईट pmsvanidhi.mohua.gov.in वर जा.
आता तुमचा मोबाईल नंबर तिथे टाईप करा व आपल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल.
ओटीपी ची पडताळणी झाल्यानंतर रजिस्टर फॉर्म समोर येईल
या फॉर्मची प्रिंट आउट काढून घ्या.
यानंतर संपूर्ण फॉर्म भरून सर्व आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करा
केंद्र सरकारने निश्चित केलेल्या स्वनिधी केंद्रावर जाऊन फार्म सहित सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करा
पडताळणी नंतर स्वनिधी योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये येईल.