माती परीक्षणासाठी यंत्र विकसित! माती परीक्षणाचा निकाल 30 मिनिटात मिळेल मोबाईलवर!

माती माती परीक्षणासाठी यंत्र विकसित! माती परीक्षणाचा निकाल 30 मिनिटात मिळेल मोबाईलवर! परीक्षणासाठी यंत्र विकसित! माती परीक्षणाचा निकाल 30 मिनिटात मिळेल मोबाईलवर

विविध पिकांच्या निकोप आणि दर्जेदार वाढीकरिता आणि भरपूर उत्पादन मिळावे यासाठी अनेक प्रकारच्या पोषक घटकांची आवश्यकता असते.  त्यामुळे सहाजिकच आपल्याला माहिती आहे की ,असे पोषक घटक हे मातीच्या माध्यमातून पिकांना उपलब्ध होत असतात.  त्यामुळे जमिन ही आवश्यक अशा पोषक घटकांनी समृद्ध असणे गरजेचे आहे.  त्याच दृष्टिकोनातून आपण रासायनिक खतांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या पोषक घटकांची पूर्तता पिकांसाठी करत असतो.

आपल्या मातीमध्ये कोणकोणत्या पोषक घटकांची कमतरता आहे.  किंवा कोणकोणते पोषक घटक अधिक्य आहेत.  याबद्दल आपल्याला माहिती नसते.  यावर एक महत्त्वाचा उपाय म्हणून माती परीक्षणाकडे पाहिले जाते.  माती परीक्षणाच्या अहवालामध्ये तुम्हाला मातीमध्ये असलेल्या प्रमुख पोषक घटकाची कमतरता आणि कोणत्या घटकाचे अधिक्य आहे. इत्यादी बाबत माहिती झाल्याने तुम्हाला खतांचे नियोजन करणे सोपे जाते . जास्त प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करण्या ऐवजी नेमक्या कोणत्या खतांचा वापर केला पाहिजे हे माती परीक्षणातून समजते.

परंतु माती परीक्षणाची जर आपण प्रक्रिया पाहिली तर ती खूप गुंतागुंतीची किचकट आहे.  कारण माती परीक्षण प्रयोग शाळेमध्ये मातीचे परीक्षण करण्यासाठी सध्या तरी भरपूर वेळ लागतो.  परंतु आता एक मशीन विकसित करण्यात आल्यामुळे अवघ्या अर्ध्या तासातच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर माती परीक्षणाचा रिझल्ट मिळू शकणार आहे. 

माती परीक्षेचा निकाल अवघ्या तीस मिनिटात मिळणार

याबद्दलची सविस्तर वृत्त असे आहे की, माती परीक्षण हे झटपट करता यावे याकरिता कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक यंत्र विकसित करण्यात आले असून, यामुळे आता माती परीक्षणाला जो काही वेळ लागायचा आहे, तो आता वाचणार आहे.  या यंत्राच्या साह्याने आता मातीमधील बारा प्रकारचे जे काही विविध पोषक घटक आहेत त्याची तपासणी करता येणे शक्य होणार आहे. 

तसेच या यंत्राचे सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे या माती परीक्षणाचा निकाल अवघ्या तीस मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच मिळणार आहे.  साधारणपणे या यंत्राच्या साह्याने तुम्हाला जमिनीतील आम्लता ,पोटॅशियम, फॉस्फरस ,तसेच सेंद्रिय कर्ब,  नायट्रोजन आणि इतर महत्त्वाच्या घटकांच्या प्रमाणाची नोंद या माध्यमातून मिळणार आहे.  तसेच हे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाणे देखील अगदी सोपे असून त्याचे वजन साडेबारा किलोच्या आसपास आहे. आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषद आणि कृषी तंत्र यांनी मिळून हे मशीन विकसित केले आहे . या यंत्राचे नाव  भू व्हिजन असे असून ते बाजारामध्ये भूमी सेवा या नावाने विक्रीस उपलब्ध होणार आहे. 

किती आहे या मशीन ची किंमत

या यंत्राची किंमत साधारणपणे दोन लाख 12 हजार रुपये इतकी आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *