शेतकऱ्याच्या दृष्टीने गरज असताना वीज उपलब्ध होणे गरजेचे आहे. शेतीमध्ये विचार केला तर बरेचदा विहिरीमध्ये पाणी असते. पण वीज वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही .व त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता वाढते. तसेच शेती करिता जो काही विजेचा पुरवठा होतो. तो बऱ्याच वेळेस रात्रीच्या वेळेस होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना रात्री पाणी द्यायला जावे लागते.
शेतकऱ्यांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान मंत्री कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत अनुदानावर सोलर पंप दिले जात आहेत . या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्ज करण्यात आले आहेत. यात लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजनेच्या लाभार्थ्यांना सेल्फ सर्वे चे मेसेज सुरू..
महाराष्ट्राचा विचार केला तर अनेक शेतकऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून सोलर कृषी पंप करिता अर्ज केले आहेत . त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. त्यांना सेल्फ सर्वेचे मेसेज आता येऊ लागलेले आहेत. अशा लाभार्थ्यांना सेल्फ सर्वेचा पर्याय उपलब्ध झाला असून लाभार्थ्यांना हा सर्वे ऑनलाइन पद्धतीने करता यावा यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर वरून महाऊर्जेचे ‘मेडा ‘नावाचे ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. हे ॲप्लिकेशन कुसुम ब लाभार्थ्यांकरता आहे. या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांना संदेश आले आहेत. अशांनी सेल्फ ऑप्शनवर हा सर्वे पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पंतप्रधान कुसुम योजना ऑनलाइन अर्ज करण्याची सर्व माहिती महाऊर्जा या www.mahaurja.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या योजनेत किती एकर क्षेत्रासाठी किती क्षमतेचा मिळतो पंप
एखाद्या शेतकऱ्याकडे जर अडीच एकर क्षेत्र असेल, तर त्यांना तीन एचपी चा सोलर पंप मिळतो. तसेच पाच एकर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला पाच एचपी चा व त्याहून जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्याला साडेसात एचपी पंप मिळतो . जर यामध्ये साडेसात एचपी पेक्षा जास्त क्षमतेचा पंप जर शेतकऱ्याला घ्यायचं असेल तर या योजनेच्या माध्यमातून फक्त साडेसात एचपी पर्यंतचे अनुदान किंवा खर्च देण्यात येतो. बाकीचे सर्व खर्च हा शेतकऱ्याला स्वतः करावा लागतो.