Tomato market price : आठवडाभरात टॉमॅटोचा कसा राहिला बाजार; भाव वाढले की घटले? जाणून घ्या..

Tomato market price : राज्यातील टोमॅटो बाजारभावात मागील काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत. मागणी, पुरवठा आणि हवामानातील बदल यांचा दरांवर थेट परिणाम दिसून येत आहे. एप्रिल महिन्यातील सुरुवातीच्या दिवसांत काही बाजारपेठांमध्ये दर वाढताना दिसत असले, तरी काही ठिकाणी मागील महिन्याच्या तुलनेत किंचित घट झाल्याचेही आढळून आले आहे. फेब्रुवारी महिन्यात पुणे बाजारात टोमॅटोचे सरासरी […]
To agricultural exporters : अमेरिकेने भारतावरचा उलटा कर कमी केला; कृषी निर्यातदारांना दिलासा..

To agricultural exporters : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या व्यापार धोरणाअंतर्गत विविध देशांवरील आयात कर अर्थात ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ लागू करण्याची घोषणा केली आहे. याआधी भारतावर १०० टक्के आयात कर लावण्याचा विचार होता, मात्र नवीन धोरणानुसार भारतावर २६ टक्के टॅरिफ निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय कृषी क्षेत्र आणि निर्यातदारांसाठी ही दिलासादायक बाब ठरू शकते. […]
onions Lasalgaon market : बुधवारी लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याचे बाजारभाव वाढले का?

onions Lasalgaon market : आज दिनांक ३ एप्रिल रोजी उन्हाळी आणि लाल कांद्याच्या बाजारभावात काही प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. कालच्या तुलनेत काही बाजार समित्यांमध्ये दर वाढले, तर काही ठिकाणी किंमती घसरल्या. दिनांक २ एप्रिल रोजी लासलगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याची एकूण १२,५०० क्विंटल आवक झाली. या कांद्याला किमान ६५० रुपये, कमाल १,५०३ रुपये तर सरासरी […]
Unseasonal rain : कांदा पटट्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना जबर फटका..

काल दिनांक २ एप्रिल रोजी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांसह विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. या जोरदार पावसामुळे शेतात साठवलेल्या कांद्यावर परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी कांदा खराब झाला आहे. नाशिकचा कांदा पट्टा समजल्या जाणाऱ्या सटाणा परिसराला पावसाचा विशेष तडाखा बसला असून कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. […]
Maharahtra weather : शेतकरी बांधवांनो सावधान! पुढेही अवकाळी पावसाचा धोका..

Maharashtra weater and rain: राज्यात २ मार्च रोजी विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी या जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाच्या सरी बरसल्या. विदर्भात अमरावती, अकोला, नागपूर परिसरातही विजांच्या कडकडाटासह पावसाची नोंद झाली. कोकणातील काही भागांतही हलका पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि डाळींच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता […]
Agricultural University : कोल्हापुरात कृषी विद्यापीठाची जागा गेली, आयटी हबसाठी जागा हस्तांतरित.

Agricultural University : कोल्हापुरातील शेंडापार्क येथील कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा आता आयटी हबसाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कोल्हापुरात आयटी उद्योगांना चालना मिळणार असली तरी कृषी संशोधन आणि शिक्षणासाठी पर्यायी जागा निश्चित करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कृषी विद्यापीठाला या बदल्यात […]
Rabi crop : आतापर्यंत कुठल्या रब्बी पिकाची किती झाली काढणी? जाणून घ्या..

Rabi crop : देशभरात रबी हंगामातील पेरणी आणि काढणीची गती चांगली असून, प्रमुख रबी पिकांची स्थिती समाधानकारक आहे. केंद्र सरकारच्या अहवालानुसार विविध राज्यांमध्ये पेरणी आणि काढणीचे प्रमाण वेगाने वाढत आहे. ज्वारीची पेरणी २४.७७ लाख हेक्टरवर झाली असून, आतापर्यंत देशभरात ७३.८९ टक्के काढणी पूर्ण झाली आहे. तमिळनाडूमध्ये संपूर्ण काढणी झाली असून, महाराष्ट्रात ८५ टक्के, कर्नाटकमध्ये ५१ […]
Kolhapuri Dams : आता कोल्हापुरी बंधाऱ्यांचे होणार बॅरेजमध्ये रूपांतर, शेतीसाठी मोठा लाभ…

Kolhapuri Dams : कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सिंचन क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना अधिक स्थिर पाणीपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील ब्रम्हनाथ येळंब, टाकळगाव हिंगणी आणि निमगाव या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यासाठी अनुक्रमे १७.३० कोटी, १९.६६ कोटी आणि २२.०८ कोटी रुपये […]
Big employment opportunity : रोजगाराची मोठी संधी; राज्यात आता मोटरसायकल टॅक्सी, लिफ्ट देऊनही कमवा पैसे..

Big employment opportunity : राज्यात मोठ्या शहरांसह निमशहरी भागातही आता दुचाकी टॅक्सी सेवा सुरू होणार असून, त्यामुळे प्रवास सुलभ होण्यासोबतच नव्या रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नव्या धोरणास मान्यता देण्यात आली असून, किमान एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ही सेवा कार्यान्वित केली जाणार आहे. वाहनसंख्येवरील ताण कमी करण्यासाठी शासनाने दुचाकी […]
kanda bajarbhav : निर्यातशुल्क हटले; पण कांदा बाजारभाव वाढलेच नाहीत..

Kanda bajarbhav : दिनांक १ एप्रिलपासून निर्यात शुल्क पूर्णपणे हटल्यानंतर कांद्याचे बाजारभाव वाढण्याची अपेक्षा होती. पण काल दिनांक १ एप्रिल रोजी राज्यातील कांद्याच्या दरात फार फरक पडलेला दिसून आला. राज्यात ३१ मार्चच्या तुलनेत १ एप्रिल रोजी उन्हाळी कांद्याची आवक वाढली असून, बाजारभाव मात्र स्थिर असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये उन्हाळी, लाल व […]