kanda bajarbhav : निर्यातशुल्क हटले; पण कांदा बाजारभाव वाढलेच नाहीत..

Kanda bajarbhav : दिनांक १ एप्रिलपासून निर्यात शुल्क पूर्णपणे हटल्यानंतर कांद्याचे बाजारभाव वाढण्याची अपेक्षा होती. पण काल दिनांक १ एप्रिल रोजी राज्यातील कांद्याच्या दरात फार फरक पडलेला दिसून आला. राज्यात ३१ मार्चच्या तुलनेत १ एप्रिल रोजी उन्हाळी कांद्याची आवक वाढली असून, बाजारभाव मात्र स्थिर असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये उन्हाळी, लाल व लोकल कांद्याचे सरासरी दर वेगवेगळ्या पातळीवर राहिले.

दरम्यान ३१ मार्च रोजी राज्यातील उन्हाळी कांद्याचा सरासरी दर १,३०० रुपये प्रति क्विंटल इतका होता. १ एप्रिल रोजी हा दर तोच राहिला, मात्र काही बाजारसमित्यांमध्ये किंचित चढ-उतार दिसून आले.

लाल व लोकल कांद्याचा दर
३१ मार्च रोजी लाल कांद्याचा सरासरी दर १,४०० रुपये तर लोकल कांद्याचा सरासरी दर १,२०० रुपये प्रति क्विंटल होता. १ एप्रिल रोजी लाल कांद्याच्या दरात मोठा बदल दिसून आला नाही, मात्र काही बाजारसमित्यांमध्ये स्थानिक मागणीनुसार किंचित वाढ किंवा घट झाली.

दिनांक १ एप्रिल रोजी राज्यातील सर्वाधिक उन्हाळी कांदा आवक असलेल्या बाजारसमित्या पुढीलप्रमाणे होत्या:

1. नाशिक– (३,९५२ क्विंटल) सरासरी दर: १,३०० रुपये
2. मुंबई कांदा-बटाटा मार्केट – (१४,११५ क्विंटल), सरासरी दर: १,३०० रुपये
3. पुणे लोकल – (५,५०० क्विंटल, सरासरी दर): १,१०० रुपये
4. जुन्नर-आळेफाटा – (३,४९४ क्विंटल, सरासरी दर) १,५५० रुपये
5. कोल्हापूर – (३,०२२ क्विंटल, सरासरी दर) १,२०० रुपये.

Leave a Reply