Wheat prices : गव्हाचे भाव कमी करण्यासाठी केंद्राचे पाऊल; शेतकऱ्यांच्या गव्हावर काय परिणाम होणार…

देशातील ग्राहकांकरिता धान्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी भारत सरकार गव्हाच्या किमतींवर बारीक नजर ठेवते तसेच आवश्यक असणारे योग्य उपाय अमलात आणते. 2024 च्या रब्बी हंगामात एकूण 1132 लाख मेट्रिक टन गव्हाचे उत्पादन झाले असून देशात गव्हाची मुबलक उपलब्धता आहे. एकूण अन्न सुरक्षा व्यवस्थापित करण्यासाठी तसेच साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी, भारत सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित […]
सध्याच्या हवामानात केळी, द्राक्ष, आंब्यांची अशी घ्या काळजी…

केळी बागेस पोटॅश 50 ग्रॅम प्रति झाड खतमात्रा द्यावी. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल 10% ईसी 10 मिली किंवा मेटीराम 55% + पायरॅक्लोस्ट्रोबीन 5% डब्ल्यू जी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंबा बागेत फुलधारणा व्यवस्थित होण्यासाठी 00:52:34 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात […]
केंद्र अडचणीत ? शरद पवार महायुतीत आल्यावर अजितदादांचा वाढणार का मान?

Sharad Pawar: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८५व्या वाढदिवशी त्यांचे पुतणे अजित पवार सकाळी त्यांच्या भेटीला गेल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दोनच महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांत या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप केले होते. मात्र आता महायुतीची सत्ता राज्यात स्थापन झाल्यावर वाढदिवसाच्या निमित्ताने पुतणे अजित पवार यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. […]
आजचे ताजे बाजारभाव .

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर शेतमाल : कांदा कोल्हापूर — क्विंटल 4195 1000 6000 2800 अकोला — क्विंटल 322 2500 4000 3000 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 3948 700 4400 2550 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 328 2000 4500 3250 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11744 […]
Maharashtra Weather: थंडी वाढली, नंदुरबार-धुळे परिसरात दवबिंदू गोठले

दि. १८ डिसेंबरपर्यन्त कमी अधिक प्रमाणात थंडी जाणवणारच आहे. उत्तर भारतातून पश्चिम मध्यप्रदेशापर्यंत पोहोचलेल्या थंडीच्या लाटेमुळे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगांव नाशिक ह्या चार जिल्ह्यात पहाटेच्या किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ३ ते ४ डिग्रीने घसरून तो ८ ते ९ डिग्री सेन्टीग्रेड पर्यन्त जाणवत आहे. त्याच्या परिणामातून नंदुरबार धुळे जिल्ह्याच्या काही भागात साधारण दवांक बिंदू तापमान […]
Soybean Bajarbhav: काय सांगता? कापसामुळे पडले सोयाबीनचे बाजारभाव? कसे ते वाचा

भारतीय कापूस महामंडळा अर्थात सीसीआयच्या कारभारामुळे तेलाच्या बाजारात ताण निर्माण होऊन सोयाबीन आणि मोहरीचे भाव पडल्याची घटना या आठवड्यात घडली आहे. दुसरीकडे परदेशातील भाववाढीमुळे सोयाबीन तेल, पामतेल, शेंगदाणा तेल यांच्या किंमती वधारले. कापसामुळे सोयाबीन तेल बियांच्या किंवा मोहरीच्या तेलबियांच्या किंमती कशा घसरल्या असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण झालेय तसेच. यंदा सीसीआय म्हणजेच कापूस खरेदी […]
kapus bajarbhav: यंदा कपाशीचे उत्पादन घटले, सध्या बाजारात कपाशीला कसा मिळतोय भाव?

मागील आठवड्यात कापसाला अकोला बाजारात सरासरी ७ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. सध्या बाजारात कापसाची आवक वाढताना दिसत आहे. तर प्रतवारीनुसार आणि धाग्याच्या प्रकारानुसार कापसाला सरासरी ७ हजार ते सव्वासात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळताना दिसत आहे. आज दिनांक ११ डिसेंबर रोजी उमरेड बाजारात कापसाची ७०५ क्विंटल आवक होऊन कमीत कमी ७ […]
Rabi crop: ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका, तूर, ज्वारी, गव्हाची अशी घ्या काळजी

Rabi crop: सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे पिकावर किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी किटकनाशकाची फवारणी करावी तसेच पिकात, फळबागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. कापूस पिकाचे व्यवस्थापन:वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. […]
Kanda Bajarbhav: उन्हाळी संपल्यात जमा; लालची आवक वाढली, जाणून घ्या लासलगाव- पिंपळगावचे कांदा बाजारभाव

Kanda Bajarbhav: आज दिनांक ११ डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात पुणे-पिंपरी बाजारात लोकल कांदयाला सरासरी ४१५० रुपयांचा प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. काल पुणे बाजारात ४७५०, तर पिंपरी बाजारात ४८५० भाव होता मात्र पिंपरी बाजारात आवक अवघी ४ क्विंटल इतकीच होती. या आठवड्यात उन्हाळी कांद्याची नाशिक जिल्ह्यातील आवक नगण्य असून लाल आणि पोळ कांदा बाजारात मोठ्या […]
Maharashtra Cabinate Expansion: आमदार बंडखोरीच्या भीतीने राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर?

राज्यात निवडणूक निकालानंतर तब्बल १२ दिवसांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदासाठी शपथविधी झाला. म्हणजेच ५ डिसेंबर रोजी. आता त्यालाही जवळपास एक आठवडा होत आला असून मुख्यमंत्री सोडले, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघे अजूनही बिनखात्याचे मंत्री बनले आहेत. त्यामुळे त्यांना खात्यांचा कार्यभार स्वीकारण्याबाबत अडचणी आहेत. अशात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार अजूनही लांबणीवर पडला आहे. शिंदे […]