Thackeray brothers : ठाकरें बंधूंच्या आंदोलनापूर्वीच सरकार नरमले? हिंदीचा भाषेचा निर्णय फिरवला…

Thackeray brothers : मागील दोन महिन्यापासून राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. त्याचे दोन जीआरही काढले, त्यासाठी स्वत: शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी पत्रकार परिषदेत माहितीही दिली. मात्र त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसेच्या राज ठाकरे या बंधूंनी एकत्र येत मोर्चाची घोषणा करताच सरकारने कच खाल्ली आणि निर्णय मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर […]
Accident-affected farmer : कर्त्या शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर या योजनेमुळे मिळतो कुटुंबाला दिलासा…

Accident-affected farmer : शेती व्यवसाय करताना अनेकदा अपघात होतात. कधी वीज पडते, कधी पूर येतो, तर कधी सर्पदंश किंवा विंचू दंश होतो. याशिवाय, विजेचा शॉक, रस्त्यावरील अपघात किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे अपघात होऊ शकतो. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा ते अपंग होतात. घरातील कर्त्या व्यक्तीला अपघात झाल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते आणि […]
Maharashtra rain update : महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढतोय, विदर्भात पावसाची शक्यता जास्त, मराठवाड्यात मात्र विश्रांती..

Maharashtra rain update : भारतीय हवामान विभागाने काल २९ जून रोजी सायंकाळी जारी केलेल्या बुलेटिननुसार महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल समाधानकारक असून, संपूर्ण देशात मान्सून ८ जुलैपूर्वीच म्हणजे २९ जून रोजीच पूर्णपणे सक्रिय झाला आहे. सामान्यतः हा कालावधी ८ जुलैचा असतो. मराठवाडा आणि विदर्भातील पावसाची स्थितीसध्या मराठवाड्यात पावसाचा जोर कमी आहे. आज ३० जून रोजी काही ठिकाणी […]
kanda bajar bhav : नाफेड कांदा खरेदीचा दर वाढला; या आठवड्याचा बाजारभाव जाणून घ्या…

kanda bajarbhav : नाफेड आणि एनसीसीएफने अजूनही कांदा खरेदीला सुरूवात केली नसली, तरी दोन आठवड्यापूर्वीत नाफेडची प्रायोगिक तत्वावर कांदा खरेदी प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र ज्या संस्थांना खरेदीचे काम देण्यात आले, त्यांच्याकडून कागदपत्रांची आणि अटी व शर्तींची पूर्तता करून घेण्याचे काम या आठवड्यापर्यंत सुरूच असल्याने ही खरेदी लांबली असल्याचे समजते. दरम्यान असे असले तरी नाफेडने […]
Soybean insurance : सोयाबीन विम्याबाहेर १५ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची चिंता वाढली…

soyabin insurance : सन २०२३–२४ पासून सुरू असलेल्या एक रुपयातील पंतप्रधान पिक विमा योजनेत आता सरकारने मोठे बदल केले आहेत. सुधारित योजनेत सोयाबीन वगळता इतर १२ पिकांच्या विमा हप्त्यावर सरकारचा हिस्सा बंद करण्यात आला आहे. तसेच, १५ जिल्ह्यांतील सोयाबीनसाठीही केंद्र आणि राज्य सरकार कोणतीही आर्थिक मदत देणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना आता विमा हप्त्याचे पूर्ण भार […]
Lakshmi Mukti Yojana : लक्ष्मीमुक्ती योजना, आता सातबाऱ्यावर शेतकऱ्याच्या पत्नीचेही नाव होणार नोंद..

Lakshmi Mukti Yojana : करवीर तालुक्यातील कुटुंबातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी ‘लक्ष्मीमुक्ती योजना’ राबविण्यात येत आहे.या अंतर्गत शेतजमिनीवर पत्नीच्याही नावाची नोंद करून नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी केले आहे. ‘लक्ष्मीमुक्ती’ योजनेमध्ये पतीच्या नावे असलेल्या शेतजमिनीमध्ये पत्नीचे सहहिस्सेदार म्हणून नाव विनामूल्य नोंदवता येते. यासाठी कोणत्याही प्रकारचे नोंदणी शुल्क किंवा मुद्रांक […]
onion rate : कल्याणमध्ये नंबर एक कांद्याला उच्च दर; पिंपळगावमध्ये उन्हाळ कांद्याला जोरदार मागणी…

onoin rate : महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये कांद्याच्या आवकेचा आणि दराचा आढावा घेतला असता, काही बाजारपेठांमध्ये विशेषतः उच्च दर मिळाले आहेत. चला तर मग, या बाजारपेठांमध्ये काय स्थिती आहे ते पाहूया. कल्याण बाजारात नंबर एकच्या कांद्याला १७०० रुपयांचा उच्च दर मिळाला आहे. या दरामुळे येथील शेतकरी आणि व्यापारी दोघेही आनंदित आहेत. हा दर इतर बाजारपेठांच्या तुलनेत खूपच […]
Tomato rates : टोमॅटोच्या दरात वाढ, श्रीरामपूर, पनवेल आणि नागपूर बाजारात उच्चांकी दर..

Tomato rates : आज दिनांक २७ जून २०२५ रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला सरासरी १६६० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. पुणे-पिंपरी बाजारात सरासरी २००० रुपये तर वाई बाजारात ९०० रुपये दर नोंदला गेला. यामधून काही बाजारांमध्ये दर वाढल्याचे चित्र दिसून आले, तर काही ठिकाणी स्थिर दर होते.दि. २६ जून रोजी राज्यात एकूण ३२४२ क्विंटल […]
kanda bajar bhav : दिलासादायक कांदा बाजारभावात थोडीशी वाढ; कुठल्या बाजारात किती मिळाला दर..

kanda bajar bhav : आज दिनांक २७ जून रोजी सकाळच्या सत्रात इस्लामपूर बाजारात कांद्याला १४५०, तर पिंपरी बाजारात १२५० रुपये सरासरी दर मिळाला. दरम्यान दिनांक २६ जून २०२५ रोजी महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी १३७० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. मागील म्हणजे २५ जूनच्या तुलनेत हा दर सुमारे २० रुपयांनी वाढलेला आहे. […]
Water storage : संभाजीनगर विभागात मागील वर्षापेक्षा यंदा चांगला पाणीसाठा..

Water storage : महाराष्ट्रातील पावसाचे आगमन आणि मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात पाणीसाठ्याच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे. २७ जून २०२५ रोजी राज्यातील सर्व जलाशयांमध्ये एकत्रितपणे ४२.४२ टक्के उपयुक्त पाणीसाठा नोंदवण्यात आला असून, मागच्या वर्षी याच दिवशी हा साठा २०.२९ टक्के होता. त्यामुळे यंदा एकूण साठ्यात तब्बल २२.१३ टक्के वाढ नोंदली गेली आहे. विभागाचे […]