पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरीब आणि होतकरू व सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा मोठा दिल्याचा दिला आहे. नरेंद्र मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आधी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण केली आहे. यावेळी मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणाचा फायदा उज्ज्वला योजनेतील कोट्यावधी नागरिकांना होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची घोषणा केली . त्यामुळे आता उज्ज्वला योजनेतील दहा कोटी ग्राहकांना आणखी मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या सबसिडीत पुन्हा वाढ केली . या आधी केंद्र सरकारकडून उज्वला योजनेतील ग्राहकांना दोनशे रुपये दिले जात होती. त्यात आणखीन शंभर रुपयांची सबसिडी वाढवण्यात आली आहे . त्यामुळे उज्ज्वला योजनेतील नागरिकांना आता फक्त सहाशे रुपये मध्ये घरगुती गॅस उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे सरकारने या आधीच 37 दिवसांपूर्वीच याबाबतची मोठी घोषणा केली होती. पुन्हा एकदा सरकारने निर्णय घेत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.
आता तीनशे रुपये सबसिडी..
केंद्र सरकारने याआधी 29 ऑगस्टला महत्त्वाची घोषणा केली होती. त्यावेळी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर दोनशे रुपये कमी केले होते. ही घोषणा देशभरातील प्रत्येक नागरिकांसाठी करण्यात आली होती. तसेच उज्ज्वला योजनेतील ग्राहकांसाठी दोनशे रुपये ची सबसिडी देण्यात आली होती. त्यामुळे उज्वला योजनेतील ग्राहकांसाठी गॅस सिलेंडरचे दर तब्बल 400 रुपयांनी स्वस्त केले होते. त्यानंतर आता याच बाबत आणखीन एक निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने उज्वला योजनेतील ग्राहकांसाठी 200 ऐवजी 300 रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे.
मोदी सरकारने सप्टेंबर महिन्यात घेतला होता निर्णय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची सप्टेंबर महिन्यात बैठक पार पडली होती . त्यावेळी याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता . मोदी सरकारने उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून 75 लाख अतिरिक्त एलपीजी कनेक्शन देण्यास मंजुरी दिली होती. तीन वर्षानंतर केले जाणारे या अतिरिक्त एलपीजी कनेक्शनचा 1650 कोटी रुपयांचा वित्तीय भारत सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे . असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले होते.