राज्यात जोरदार पाऊसाची शक्यता ,कुठे कुठे बरसणार जाणून घ्या सविस्तर ..

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मान्सून संदर्भात ही बातमी आहे .जाता जाता मान्सून मनसोक्त बरसणार असे बोलले जात आहे. काही दिवसांपासून सगळ्यांना मान्सूनच्या परतीच्या पावसाचे वेध लागले आहे. दरवर्षी सप्टेंबर महिना सुरू झाला की मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होणार असा प्रश्न केला जातो .

सध्या राज्यातील शेतकरी बांधव याच बाबत सतत विचारणा करत आहेत. अशातच एक नवीन अंदाज पंजाबराव डख यांनी जाहीर केला आहे.महाराष्ट्रातील पुढचे पंधरा दिवस हवामान कसे राहणार या संदर्भात मोठी अपडेट दिली आहे.

2 ऑक्टोबर पर्यंत पाऊस

महाराष्ट्रात पुढील पंधरा दिवस म्हणजेच जवळपास 2 ऑक्टोबर पर्यंत पाऊस सांगितला आहे. पावसाला कधीपासून सुरुवात होणार ,राज्यातील कोणत्या भागांमध्ये पाऊस पडणार याबद्दल पंजाब रावांनी माहिती दिली आहे. राज्यात 20 सप्टेंबर पर्यंत पावसाची विश्रांती पाहायला मिळणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात शेती ची कामे उरकून घ्यावीत . कारण पुन्हा राज्यामध्ये 21 सप्टेंबर पासून पावसाला सुरुवात होणार आहे.काही भागांमध्ये 20 सप्टेंबर पासूनच पावसाला सुरुवात होणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.

20 सप्टेंबरला सर्वप्रथम पूर्व विदर्भात पाऊस सक्रिय होणार आहे.21 सप्टेंबरला राज्यातील पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यात पाऊस 2 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. या काळात पूर्व विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र,पश्चिम विदर्भ, कोकण, खानदेश आणि मराठवाडा या भागात त्यानंतर २१ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पावसाची शक्यता वर्तवली आहे.

या कालावधी मध्ये राज्यात खूपच मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार आहे काही ठिकाणी पूरस्थिती तयार होण्याची देखील शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी विशेष सावध राहणे गरजेचे आहे. वीज पडण्याच्या देखील घटना या कालावधीत घडू शकतात यामुळे आपल्या जनावराची विशेष काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन पंजाब रावांनी केले आहे.

दरम्यान 25 ते 27 सप्टेंबर या कालावधी मध्ये नाशिककडे तुफान पावसाची शक्यता आहे. राज्यात नवरात्र उत्सवात, दसऱ्याला खूप मोठ्या पावसाची शक्‍यता आहे. जोरदार पावसामुळे काही प्रमुख धरणे फुल भरणार आहेत.

ऑक्टोबरच्या शेवटी सुद्धा पावसाचे तांडव पाहायला मिळेल असे पंजाबरावांनी आपल्या आधीच्या अंदाजात सांगितले होते . यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहून जेव्हा पावसाची उघडीप असेल त्या कालावधीत शेतीची कामे करून घ्यावीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *