विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता ; चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’…

विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता ; चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’

पावसाला पोषक वातावरण होताच मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे . आज विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून गडचिरोली,  चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  मराठवाडा ,विदर्भ, कोकणात तुरळक  ठिकाणी जोरदार पाऊस विजांसह  वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

मान्सूनचा आस असलेला कमी दाबा च्या पट्ट्याचे पश्चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे कायम असून पूर्व टोक दक्षिणेकडे आले असून पटना,  गोरखपुर हजारीबाग, बंकुरा, दिघा ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागर पर्यंत सक्रिय आहे. 

वायव्य उत्तर प्रदेशांमध्ये समुद्रसपाटीपासून 1.5  ते 3.1  किलोमीटर उंचीवर ओडिशामध्ये समुद्रासपाटीपासून 4.5 ते 7.6 किलोमीटर उंचीवर तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेश परिसरावर 4.5 ते 5.8 किलोमीटर उंचीवर चक्रकार वाऱ्यांची स्थिती आहे . यामध्ये बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी क्षेत्रामुळे राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे. 

सोमवारी (ता 4)  सकाळपर्यंतच्या  24 तासात मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात ,अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला होता . सकाळपासून वाढलेला उन्हाचा चटका उकाड्यापाठोपाठ दुपारनंतर ढग जमा होत पावसाच्या सरी कोसळत आहेत.  आज पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भासह मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्रात पूर्व ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याचा इशारा आहे.  तर उर्वरित राज्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. 

उपसागरात कमी दाब क्षेत्राची शक्यता

ईशान्य बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे.  या वाऱ्याच्या प्रभावामुळे पूर्व मध्यम बंगालच्या  उपसागरात आज सकाळपर्यंत हवेची कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची संकेत आहेत.  वरील चक्राकार वाऱ्यापासून उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *