फेरफार नोंदीची फाइल अडलीय ? ‘आपली चावडी’वर जा, ट्रॅक करा.

फेरफार नोंदीची फाइल अडलीय 'आपली चावडी'वर जा, ट्रॅक करा

तुम्ही सातबारावर काही फेरफार केली आहे का ? तुमच्या मालमत्ता पत्रिकेवर फेरफार नोंदविण्याचा अर्ज केला आहे का?  तुमचे एखादे प्रकरण रखडले आहे का ? तर आता तुम्हाला याबाबत कुठेही जाण्याची गरज नाही.

घरबसल्या तुमच्या प्रकरणाचे ट्रेकिंग आता ऑनलाईन करता येणार आहे.  एखाद्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याकडे हे प्रकरण असल्यास ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीमध्ये कळू शकणार आहे.  याबाबत तुम्ही संबंधिताला  याविषयी विचारणा करू शकता. 

आपली चावडी या भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर आता ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.  यातून सातबारा उतारा,  मिळकत पत्रिका , तसेच मोजणीच्या प्रकरणामधील प्रलंबितता दिवस कमी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या संचालकांनी हे पाऊल उचलले आहे. 

सातबारा उतारा किंवा मिळकत पत्रिकेत फेरफार केल्यानंतर त्याला मान्यता मिळून सुधारित सातबारा किंवा मिळकत पत्रिका आपल्या  हातामध्ये येईपर्यंत या प्रकरणाची विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पडताळणी केली जाते.  व त्यानंतर त्याला मान्यता मिळते , मात्र एकदा फेरफार केल्यानंतर ते किती दिवसात मिळू शकेल याची माहिती सामान्यांना नसते या अगोदर आपली चावडी या संकेतस्थळावर एखादे प्रकरण कोणत्या स्तरावर प्रलंबित आहे हे केवळ फक्त वरिष्ठ अधिकाऱ्याने कळत होते . परंतु आता भूमी अभिलेख संचालक व जमाबंदी आयुक्त निरंजन कुमार यांनी ही सुविधा सर्वसामान्यांसाठीही उपलब्ध करून दिली आहे

प्रलंबितता कमी होणार.

सध्या पुणे विभाग अशा फेरफार नोंदीची सरासरी दिवसाची संख्या 26 इतकी आहे. कोकण विभागात यासाठी मात्र 31 दिवस लागतात . अमरावती विभागात फक्त वीस दिवसातच फेरफार नोंद पूर्ण होते . या ऑनलाइन सुविधामुळे फेरफार नोंदणीची सरासरी दिवसाची संख्या कमी होऊन या प्रक्रियेला कमी दिवसात पूर्ण करता येणार आहे . कर्मचारी व अधिकाऱ्यांची कार्यक्षमता यातून वाढीस लागणार आहे.

निरंजन कुमार सदाशिव संचालक भूमी अभिलेख व आयुक्त जमाबंदी विभाग पुणे

”ही ऑनलाईन सुविधा असून अर्जदाराला घरबसल्या आपल्या प्रकरणाचे ट्रेकिंग करता येणार आहे.  सध्या सातबारा व मिळकत पत्रिकेतील फेरफार नोंदी संदर्भातील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून लवकरच जमीन मोजणी प्रक्रियेतील सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आपले प्रकरण नेमके कोणत्या टेबलावर किती दिवस रखडले याची माहिती सर्वसामान्यांना मिळाल्यानंतर संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना याविषयी ते विचारणा करू शकतील.  त्यामुळे सामान्यांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे” . 

तुम्हाला डावलले का?  हे कळेल

सातबारा उताऱ्यातील फेरफार नोंद केल्यानंतर त्या संदर्भातील नोटीस काढणे हरकती आल्याची नोंद करणे,  हरकतीची तारीख निश्चित करणे व संबंधिताने त्यावर सुनावणी घेऊन त्याला मान्यता देणे अशा टप्प्यामधून हे प्रकरण जाते

प्रकरण आता तारखेनुसार संकेतस्थळावर दिसणार आहे.  त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली हे देखील दिसून येईल त्या दिवशी किती प्रकरणे आली व त्यावर संबंधित अधिकाऱ्याने काय नेमकं निर्णय घेतलेला आहे हे देखील त्यावर दिसणार आहे. 

त्याच दिवशी अन्य प्रकरणांमध्ये काय कार्यवाही झाली व आपल्या प्रकरणाबाबत काय कार्यवाही झाली हे कळल्यानंतर जर असे प्रकरण रखडले असेल तर अर्जदार संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना या संदर्भात विचारणा करू शकणार आहेत. 

त्यामुळे एखादे प्रकरण डावलून दुसरे प्रकरण पुढे रेटण्याचा प्रकार या विचारणे मुळे कमी होणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *