कधीकधी लोक पैशासाठी अंडी विकतात. कोंबड्यांची काळजी घेऊन शेतकरी पैसे कमवू शकतात. पावसाळा , उन्हाळा ,असो की हिवाळा अंड्यांची मागणी सतत चालूच असते . अंड्यांपासून तयार झालेले सर्व पदार्थ लोकांना आवडतात . लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्यांच्या अंड्यांची मागणी करत असतात .वेगवेगळ्या प्रकारच्या अंड्यांचे वेगवेगळे भावही असतात . सहसा कोंबडीच्या अंड्याचा भाव सहा रुपये ते दहा रुपये असा आहे. असेही काही अंडे आहेत कीं जे शंभर रुपयांना विकली जातात . कोंबड्यांची पालन करून शेतकरी चांगले पैसे कमवू शकतात.
बहुतेक कोंबडी फार्ममध्ये एकाच प्रकारच्या कोंबडया असतात .अंड्यांची किंमत साधारणतः 6 ते 10 रुपये असते, परंतु कडकनाथ नावाच्या कोंबडीचे अंडी आणि मांस जास्त महाग आहे. एका कडकनाथ अंड्याची किंमत 30 ते 35 रुपये आहे.
धोनीकडे कडकनाथ कोंबडीचा व्यवसाय
एक हजार ते दीड हजार रुपये किलो कडकनाथच्या मांसाचा भाव बाजारात आहे. ह्या भारतातील सर्वात महाग असणाऱ्या कोंबड्या समजल्या जातात. भारतीय क्रिकेटचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी देखील कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे.परंतु भारतामध्ये एक अशी कोंबडीची जात आहे की ज्या कोंबडीच्या अंड्याची किंमत १०० रुपये आहे. कडकनाथ कोंबडी ही एक विशेष प्रकारची कोंबडी आहे जी सर्व काळी आहे – अगदी त्याची पिसे, रक्त आणि मांसही! त्याचे वजन सुमारे पाच किलो आहे. काही राज्यात मध्ये कडकनाथ या कोंबड्यासाठी सरकार अनुदान देखील देते .
साधारण वर्षांला असील कोंबडी ६० ते ७० अंडे देते
कडकनाथ पेक्षाही असिन कोंबडी महाग मानली जाते . प्रत्येकी 100 रुपये! लोकं या कोंबडीचे मास कमी खातात. परंतु लोकांना त्याची अंडी आवडतात. काही लोक तर औषध म्हणून अंडी खातात! शेतकऱ्यांनी असिन कोंबड्यांचे पालनपोषण केल्यास ते भरपूर पैसे कमवू शकतात.
असिन कोंबडी एका वर्षात ६० अंडे देत असेल तर १०० रुपयांनी त्याची किंमत सहा हजार रुपये होते. जर आपण २० कोंबड्याचे पालन पोषण केल्यास तर आपणास वर्षाला १ लाख २० हजार रुपये मिळू शकतात .