जगभरातील तांदूळ उत्पादनावर एल निनोमुळे परिणाम झाला आहे. त्यामध्ये तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार देश असलेल्या भारताने तांदूळ निर्यातीवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे आशियासह संपूर्ण जगामध्ये तांदळाच्या किमतींवर परिणाम होऊ लागले आहेत. देशातील बाजारपेठेमध्ये तांदळाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी मोदी सरकारने उकडा तांदळावरील 20 टक्के निर्यात शुल्काची मुदत वाढविण्याचा विचार केला आहे. आगामी सणासुदीचा हंगाम आणि पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार हा निर्णय घेऊ शकते.
जुलै महिन्याच्या अखेरीस देशांतर्गत बाजारात तांदळाच्या किमतीत झालेली वाढ पाहता केंद्र सरकारने उकडा तांदळाच्या निर्यातीवर 20 टक्के शुल्क लावण्याचे निर्णय घेतला होता. हा निर्णय 15 ऑक्टोंबर 2023 पर्यंत लागू आहे. भारताने जुलैमध्ये निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आशियाई बाजारातील तांदळाच्या किमती 15 वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या होत्या . भारताने निर्यात शुल्क लादण्याबरोबरच, खराब हवामानाचाही यंदा तांदूळ उत्पादनावर परिणाम झाला आहे.
एल निनोच्या प्रभावामुळे तसेच खराब हवामानामुळे भारतासह जगभरात तांदूळ उत्पादनावर परिणाम झाला असून तांदळाचा प्रमुख निर्यातदार असलेल्या इंडोनेशियाचे यंदा तांदळाचे उत्पादन सरासरीपेक्षा कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे . तसेच व्हिएतनामनेही अशीच परिस्थिती आहे.
सणासुदीचा हंगाम तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी भारताने निर्यात शुल्काची मुदत वाढवली तर त्याचा परिणाम जगभरातील तांदळाच्या किमतीवर नक्कीच होईल. दक्षिण आशियाई आणि आफ्रिकेतील देशांमध्ये उकडलेले तांदूळ सर्वात जास्त प्रमाणात वापरले जातात. भारतामध्ये दरवर्षी तांदळाच्या अनेक जाती पिकवल्या जातात. ज्यामध्ये उकडा तांदूळ हा प्रमुख भाग आहे. देशातील तांदूळ निर्यातीत उकडा तांदळाचा वाटा तीस टक्के आहे.
तूर आणि हरभरा डाळींच्या किमतीत चार टक्के नि घट..
आयत वाढल्यामुळे आणि ग्राहकांची मागणी कमी झाल्यामुळे गेल्या महिन्यामध्ये भारतात डाळींच्या किमती सुमारे चार टक्क्यांनी कमी झाले आहेत. सरकारने लाभलेल्या स्टॉक मर्यादेमुळे तूर आणि हरभरा डाळींच्या किमतीत चार टक्के घट झाली असून, चना डाळींच्या किमतीत देखील वाढीव पुरवठा आणि स्पर्धात्मक चार टक्क्यांनी घसरण झाली आहे. मात्र सणासाठीच्या काळामध्ये किमती वाढू शकतात . असे उद्योग अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे ,या उलट टोमॅटोच्या किमती घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत.