सुपर गाय देणार एका दिवसात 140 लीटर दूध

supercow

सध्या अनेक गोष्टींवर वेगवेगळे प्रयोग केले जातात. यामध्ये चीन आघाडीवर आहे. चीनकडून (China) माणसांसोबतच प्राणी आणि पक्ष्यांवरही विविध वैज्ञानिक प्रयोग(Scientific Experiment) सुरु आहेत.

आता चीनमधील शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, त्यांनी क्लोनिंगच्या (Cloning) मदतीने ‘सुपर काऊ’ (Super Cow) म्हणजे  सुपर गाय तयार केली आहे. या गायी सामान्य गायींपेक्षा अनेक पटीने जास्त दूध देऊ शकतात, असाही दावा चिनी शास्त्रज्ञांकडून करण्यात येत आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, सुपर गाय एका दिवसात 140 लीटर दूध देऊ शकते. यामुळे हा आकडा खूपच मोठा आहे. क्लोन गाय म्हणजे सुपर गाय तिच्या संपूर्ण आयुष्यात 100 टन म्हणजेच 2 लाख 83 हजार लिटर दूध देऊ शकेल. 

चीनमधील शास्त्रज्ञांकडून पुढील दोन वर्षात अशा 1000 गायींचे उत्पादन करण्यावर लक्ष आहे. असे झाल्यास दूध उत्पादनात मोठी वाढ होईल. शास्त्रज्ञांनी 23 जानेवारी रोजी सुपर गायीच्या तीन बछड्यांना यशस्वीरित्या क्लोन केल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी शास्त्रज्ञांची ही कामगिरी देशाच्या डेअरी उद्योगासाठी क्रांतिकारक असल्याचे म्हटले आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

source: krishijagran

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *