कमी खर्चात करा अँपल सीताफळाची लागवड आणि करा कमाई लाखोत ! वाचा या जातीविषयी माहिती..

विविध प्रकारच्या फळ झाडांची लागवड महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर होत असते.   यामध्ये जिल्हा नुसार विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष ,काही भागांमध्ये डाळिंब यासारख्या फळबागा मोठ्या प्रमाणावर आहेत.  तसेच त्या खालोखाल महाराष्ट्र मध्ये पेरू व सीताफळ  यांची देखील लागवड मोठ्या प्रमाणावर होते.  ज्याप्रमाणे इतर पिकांच्या अनेक व्हरायटी असतात.  त्याचप्रमाणे फळबागांमध्ये अनेक प्रकारचे व्हरायटी आपल्याला बघायला मिळतात . यामध्ये सीताफळ लागवड आणि त्यासाठी लागणारा खर्च व नफा याचे एकत्रित विचार केला तर सिताफळ लागवड ही शेतकऱ्यांना परवडण्यासारखे आहे. 

कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी पाण्यामध्ये सीताफळ चांगले उत्पादन देऊ शकते .  सिताफळांचे देखील अनेक प्रकारच्या जाती आहेत.  व त्या जातींचे त्याच्यानुसार वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत.  याच्या अनुषंगाने जर आपण सीताफळांच्या एप्पल सीताफळ या जातींचा विचार जर केला तर बीड या ठिकाणच्या एका संशोधन केंद्रामध्ये ही जात विकसित करण्यात आलेली आहे.  सीताफळाच्या इतर जातीपेक्षा ही जात खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे.

इतर सीताफळांच्या जातींच्या तुलनेमध्ये जर आपण कस्टर्ड  ॲप्पल या जातीचा विचार केला तर इतर जातींमध्ये बियाणांचे प्रमाण प्रतिफळ 25 ते 30 असते . परंतु एप्पल कस्टर्ड म्हणजे एप्पल सीताफळामध्ये बियांचे प्रमाण अवघे चार इतके असते.  त्यामुळे बाजारपेठेमध्ये देखील खूप मागणी आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई या ठिकाणी कस्टर्ड ॲप्पल म्हणजे सीताफळावर संशोधन करणारे केंद्र असून यामध्ये 21 विविध प्रकारची कस्टर्ड ॲप्पल तयार करण्यात आलेली आहे . विशेष म्हणजे सरकारकडून याला पेटंट देखील मिळाले आहे.  साधारणपणे 2016 वर्षापासून विचार केला तर शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत कस्टर्ड ॲप्पल संशोधन केंद्राच्या माध्यमातून 300 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रामध्ये सिताफळ कलमांची  लागवड केली आहे.

 अंबाजोगाई येथील संशोधन केंद्रामध्ये  तयार केलेल्या कस्टर्ड ॲप्पलच्या रोपांची लागवड राज्यातील जळगाव, सोलापूर, तसेच नागपूर, लातूर, बीड ,नाशिक तसेच नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर केली आहे.  आज पर्यंत या संशोधन केंद्र मध्ये कस्टर्ड ॲप्पल ची आठ लाख रुपये तयार करण्यात आलेले आहेत . कस्टर्ड सफरचंद अर्थात कस्टर्ड ॲप्पल प्रक्रिया उद्योगासाठी महत्त्वाचे आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर  लागवड  केली आहे .

या संशोधन केंद्राच्या माध्यमातून या कस्टर्ड ॲप्पल अर्थात या कस्टर्ड सफरचंदाच्या जातींवर प्रक्रिया करण्यात येणार आहे. भविष्यामध्ये या जातीपासून प्रक्रिया युक्त पदार्थ तयार केले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट  होण्यास मदत होणार आहे. कस्टर्ड ॲप्पल च्या उत्पादनाकरिता खूप कमी पाणी लागते तसेच त्या माध्यमातून उत्पादन खूप चांगले मिळते .

Leave a Reply