आता काळा गहू, काळी हळद, अशा रंगाचे अनेक तृणधान्य दिसत आहे. हे तृणधान्य बियाणे संवर्धनापुरते मर्यादित दिसते आहे परंतु काही शेतकरी याची शेती करताना दिसत आहे. यात काळी मकाची शेती करताना दिसत आहे.
मक्याचे पीक महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये घेतले जाते तर त्यामधील काही ठिकाणी तांबड्या आणि पांढऱ्या मक्केचे पीक घेतले जाते.पांढऱ्या व तांबड्या मक्केच्या उत्पादनाला काही मर्यादा पडत असताना काळी मक्का १२ महिने चांगले उत्पादन देत असते . असे शेतकऱ्यांच्या अनुभवातून दिसून आले आहे.
शेतकरी काळ्या मक्याचेही पीक पांढरा तसेच तांबड्या मक्क्याप्रमाणेच घेता येते. या मक्केचा उपयोग हा जनावरांना आहारात करता येतो . भारतात प्रामुख्याने उडीसा मध्ये काळ्या मका या पिकाची लागवड करण्यात येते. तर महाराष्टामध्ये काळ्या मक्याचे पीक हे अगदी कमी आहे.
पूर्वी लोक मक्केची भाकरी खात होते. परंतु अलीकडच्या काळात लोकांचा मक्केकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. लोक जास्त करून मक्केची भाकरी खात नाहीत. मात्र या मक्याची भाकरी बनवून खाल्यास आरोग्यासाठी हे अत्यंत गुणकारी असते .
काळ्या मकेची वैशिष्ट्ये
काळ्या मकेचा बाहेरील आवरणाचा रंग हिरवा मात्र व दाण्याचा रंग काळा असतो.
यामध्ये मक्केमध्ये मिनरल्स, कॅल्शियम, प्रोटीन ,आयर्न भरपूर प्रमाणात असते.
य मकेचा जनावरांच्या आहारामध्ये याचा समावेश केल्यास दुभत्या जनावरांच्या दुधामध्ये वाढ होते.
उन्हाळ्याच्या हंगामात काळ्या मक्केची लागवड केली तरीही चांगली येते.
चांगल्या प्रतीची या मक्केला दोन कणसे येतात. या मक्केचे उत्पादन साडेचार महिन्यात निघते .
या मक्याचे वाणाचे उत्पादन उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूमध्ये घेता येते.
पावसाळ्यामध्ये या वाणाच्या मक्याला एका ताटाला तीन ते पाच कणसे लागतात आणि उन्हाळ्यामध्ये २ ते ३ कणीस लागतात.
ताटाची उंचीची चांगली वाढते त्यामुळे शेतकऱ्यांना मुरघास बनवायचा असल्याचं हा वाण योग्य ठरतो.
काळी मकेला बाजार दरापेक्षा जास्त पटीने दर मिळतो .
हि मका दुर्मिळ असल्याने सध्या बाजारामध्ये ३०० रूपये किलोप्रमाणे विक्री होते आहे असे शेतकरी सांगतात.












