केळी खाणे सर्वांनाच आवडत असते. केळी हे फळ वर्षभर मिळत असते. याची शेती देशात सर्व ठिकाणी केली जाते .परंतु आंध्रप्रदेश केळीचा सर्वात मोठा उत्पादक प्रदेश आहे .देशात उत्पादित होणाऱ्या 17.9% केळीचे उत्पादन हे आंध्र प्रदेशात होते. महाराष्ट्रातील शेतकरी देखील केळीचे उत्पादन घेत असतात. शिकलेले लोक शेतीतील मातीत जुळत आहेत.
आज-काल चे युवक आधुनिक पद्धतीचा वापर करून शेती करतात व चांगले उत्पन्न मिळवतात अशाच एका युवा शेतकऱ्या बद्दल आपण जाणून घेणार आहोत. या युवा शेतकऱ्याचे नाव अभिजीत पाटील आहे.
ते महाराष्ट्र मधील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील बशिम्बे गावचे रहिवासी आहेत. अभिजीत पाटील हे सिव्हिल इंजिनिअरिंग आहेत. त्यांनी नोकरी करण्यापेक्षा शेती करण्याकडे जास्त लक्ष दिले व हेच त्यांना फायदेशीर ठरले. ते लाल केळीची शेती करतात व लाखो रुपयांची कमाई करत आहेत .ते पारंपरिक पद्धतीने शेती करत होते .परंतु त्यांना फायदा झाला नाही. त्यामुळे त्यांनी आधुनिक पद्धतीची शेती करणे सुरू केले आहे.
2015 ला केली केळीची लागवड
यांनी सुमारे चार एकर जागेत लाल केळीची लागवड केली .त्यातून त्यांना चांगला फायदा मिळाला लाल केळीच्या शेतीतून आत्तापर्यंत त्यांनी 35 लाखाचे उत्पन्न घेतले आहे. केळीचे उत्पादन तयार होण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागतो .एका एकर जागेसाठी एक लाख रुपये खर्च येत असतो. अशा प्रकारे चार लाख रुपये खर्च करून केळीची शेती त्यांनी केली. व यातून त्यांना दरवर्षी लाख रुपयांचा फायदा मिळाला
दरवर्षी 60 टन केळीचे उत्पादन घेतात
अभिजीत पाटील यांच्या सांगण्यावरून लाल केळीमध्ये हिरवे आणि पिवळे केळीच्या तुलनेत अधिक विटामिन आणि पोषकतत्वे असतात. यामुळे लाल केळीची मागणी जास्त वाढत आहे .लाल केळीला जास्त भाव सुद्धा मिळतो. लाल केळीचा भाव सध्याचा 60 रुपये डझन आहे. सामान्य केळीच्या तुलनेत याचा भाव जास्त असतो.