लिंबूच्या या टॉप तीन जातीची करा लागवड मिळेल भरघोस उत्पन्न ..

कागदी लिंबाला मोठी मागणी महाराष्ट्रात आहे त्यामुळे त्यांची लागवड येथे मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. लोणच्यासाठी लेमनची फळे चांगली असतात. लिंबामध्ये दोन प्रकार आहेत पहिला प्रकार लेमन (जाड सालीचे),आणि एक लाईम (पातळ सालीचे लिंबु)

जाती

स्थानिक जातीपासून कागदी लिंबामध्ये लागवड झालेली झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात जास्त उत्पादन देणाऱ्या फळांची उत्तम प्रत असलेल्या जाती आता प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांना त्यांची निवड करणे जास्त फायद्याचे ठरते.

त्यापैकी काही जाती त्यांचे वर्णन खालील प्रमाणे ..
1. प्रमालीनी,
2. विक्रम,
3. साईशरबती,

१) प्रमालिनी
• स्थानिक जातीपेक्षा ३५ ते ३९ टक्के जास्त उत्पादन देणारी जात आहे .
• जुन-जुलै व नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये फळधारणा होते.
• ५७ टक्के रसाचे प्रमाण .
• फळधारणा ३ ते ७ गुच्छात

२) विक्रम
• ३० ते ३२ टक्के स्थनिक जातीपेक्षा उत्पादन जास्त.
• जून-जुलै, नोव्हेंबर-डिसेंबर व नेहमीच्या हंगामाव्यतिरिक्त महिन्यात फळसाधारण होते व उन्हाळ्यात फळे चांगली मिळतात.
• फळे ५ ते १० गुच्छात येतात.

३) साई शरबती
• पश्चिम महाराष्ट्रातील स्थनिक जातीपासून निवड पद्धतीने जात विकसीत करण्यात आली आहे .
• उन्हाळ्यामध्ये २५ टक्के जास्त उत्पादन देणारी.
• जास्त उत्पादन देणारी जात, जास्त विद्राव्य पदार्थ व आम्लता असलेली ,फळे नियमीत आकाराची असतात .
• खैऱ्या रोगास प्रतिकारक.
• ५५ टक्के रसाचे प्रमाण .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *