बंगालचा उपसागरात तयार झालेले ‘मोचा’ चक्रीवादळ हे झपाटयाने वाढत असून अतितीव्र झाले आहे. त्याचा परिणाम भारतातील अनेक राज्यावर होणार आहे.बांगलादेश आणि म्यानमारकडे जाणारी ही प्रणाली उपसागरातून ईशान्येकडे सरकू लागली आहे.
हे अतितीव्र चक्रीवादळ उद्या (ता. १४) दुपारपर्यंत किनाऱ्याला धडकणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. परंतु या चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावर फारसा जाणवणार नाही.
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळची अधिक तीव्रता वाढली आहे. (ता. १२) शुक्रवारी बांगलादेशाच्या कॉक्सबाजार पासून 950 किलोमीटर दक्षिणेकडे, पोर्ट ब्लेअरपासून 530 किलोमीटर पश्चिमेकडे, तर म्यानमारच्या सिट्वेपासून 870 किलोमीटर नैॡत्यकडे होती.
अतितीव्र चक्रीवादळा मुळे वारे ताशी 150 ते 175 किलोमीटर या वेगाने वाहू लागले आहे. म्यानमारच्या ‘क्याउक्प्यू’ व बांगलादेशाच्या कॉक्स बाजार या दरम्यान रविवारी दुपारपर्यंत किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ढगांची दाटी झाली आहे यामुळे तिथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे.या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ईशान्य भारतातील त्रिपुरा, मणिपूर, दक्षिण आसाम, अंदमान निकोबार बेट समूह, मिझोराम, , पूर्व अरुणाचल प्रदेश,नागालँड या राज्यात हवामान विभागाच्या अंदाजनुसार जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल .तसेच समुद्र खवळून उंच लाटा उसळणार असून मच्छीमारांनी या कालावधीमध्ये समुद्रात जावू नये असा इशारा देण्यात आला आहे.