गोशाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णय मा. मंत्रिमंडळाने दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ राज्यात दि. ४ मार्च, २०१५ पासून लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार संपूर्ण गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीवर प्रतिबंध करण्यात आलेले आहे. त्यामुळे , ओझी वाहण्यासाठी शेतकामासाठी व पैदाशीसाठी उपयुक्त नसलेले गोवंशीय बैल व वळू यांच्या कत्तलीवर बंदी घालण्यात आली आहे . सदर पशुधनापासून अत्यल्प उत्पन्न मिळत असल्याने ,गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्थांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही त्यामुळे गोशाळा, पांजरपोळ व गोरक्षण संस्था, गोसदन, यांना बळकट करण्याकरिता गो संगोपनासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या योजनेस मा. मंत्रिमंडळाने दि. ३० सप्टेंबर, २०२४ रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.