यंदा उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रात घट; गतवर्षीच्या तुलनेत चाळीस टक्क्यांपेक्षा कमी होणार लागवड ..

कांदा हे प्रमुख आणि नगदी पीक असणाऱ्या कसमादेसह  ,चांदवड, येवला ,नांदगाव ,या भागात अल्प पाऊस झाल्यामुळे उन्हाळ कांद्याची लागवड गतवर्षीच्या तुलनेत 40% पेक्षा कमी होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

मागील वर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये उच्चांकी  2 लाख 20 हजार 864 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ रब्बी कांद्याची लागवड झाली होती.  परंतु यंदा मात्र सव्वा ते दीड लाखाच्या आसपास क्षेत्रावर उन्हाळ कांद्याची लागवड होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.  त्यामुळे उन्हाळ कांद्याचे उत्पादन घटणार हे नक्की

कांदा उत्पादक क्षेत्रात पावसाळी म्हणजे पोळ कांदा, लेट खरीप कांदा व उन्हाळी रब्बी कांदा असे तिन्ही प्रकारचे कांदा पीक घेतले जाते.  पण कांदा उत्पादक शेतकरी उन्हाळी कांद्याला जास्त पसंती देतात.यावर्षीच्या पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगामाची तर होरपळ झालीच शिवाय पावसाच्या वक्रदृष्टीमुळे नद्या नाले धरणे तलाव कोरडे टाक आहेत.  त्यामुळे रब्बी हंगाम घेणे अशक्य आहे.  अशी सर्व परिस्थिती असल्याने उन्हाळा कांदा लागवड क्षेत्रात मोठी घट होणार आहे.

सध्या उन्हाळ कांद्यासाठी रोपवाटिक अर्थात उळे टाकले जात आहे.  गिरणा मोसम आरम या नदीकाठावरील शेतकरी तसेच पाठ कॅनलचे लाभार्थी व असेच काही थोडेफार शेतकरी उळे टाकत आहेत. तरी इतर  शेतकऱ्यांनी लेट खरीप कांदा घेणे पसंत केले आहे.

भावात घसरणच

मधल्या आठ ते दहा वर्षाच्या काळात डाळिंब येथील प्रमुख पीक होते, परंतु तेल्या रोगाच्या आक्रमणामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब बागा उपटून पुन्हा कांद्यावर लक्ष केंद्रित केले . मागील वर्षी कांद्याचे बंपर उत्पादन झाले कांद्याचे भावात वाढ होईल . या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवला, परंतु कांद्याचे भाव वाढणार अशी स्थिती असताना कांद्याची निर्यात शुल्क 40 टक्के केल्याने इथूनच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे वासे फिरले.  पुढे जाऊन व्यापाऱ्यांनी त्या विरोधात लीला बंद ठेवले. त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा चाळीतच खराब झाला.

सुरुवातीला भाव नव्हता .मधल्या टप्प्यात कांदा खराब झाला नंतर निर्यात शुल्क वाढले . मग व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवले आणि आता आवक वाढली यामुळे कांदा चे भाव शेवटपर्यंत वाढलेच नाहीत.

२०२२ -२३ या वर्षातील उन्हाळ कांदा लागवड (हेक्टरमध्ये)

कळवण २६१०९

सटाणा ५१७३३

मालेगाव ३४६००

देवळा २१३६४

चांदवड १९२५५

येवला २५२७८

सिन्नर ११८५८

नांदगाव १११२३

निफाड १४७५१

नाशिक ११८४

इगतपुरी ३४०

पेठ १७७

त्र्यंबकेश्वर १२०

दिंडोरी २५१८

सुरगाणा ४११
एकूण – २२०८६४ हेक्टर

२०२३-२४ अंतर्गत जिल्ह्यातील अंतिम खरीप कांदा लागवड : १६ हजार ३०० हेक्टर

कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा उन्हाळ कांद्याची लागवड क्षेत्र 40 ते 45 टक्के घट येण्याची चिन्हे आता स्पष्टपणे दिसत आहेत . पाऊस नसल्याचा हा परिणाम आहे.  कसमादेसह कांदा उत्पादक करणाऱ्या इतरही तालुक्यात पाण्याची टंचाई असल्याने उन्हाळ कांद्याचे उत्पादन घटणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *