९०० एकर पार्किग, ३०० एकर वर सभा, १०,००० स्वयंसेवक, २५०० पोलीस, ५०० होमगार्ड, 300 डॉक्टर्स अशी आहे आजच्या जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण मेळाव्याची जंगी तयारी.

मराठाआरक्षणासाठी राज्य सरकारनं 40 दिवसांचा वेळ मागून घेतला होता शनिवारी या मुदतीचे ३० दिवस पूर्ण होतात त्याच पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांची सभा होते आहे, या सभे साठी महाराष्ट्रातील लाखो मराठा समाज येणार आहे त्यामुळे ह्या सभेची जय्यत तयारी मराठा समाज आणि प्रशाषनाणे केली आहे. सदर सभेसाठी ९०० एकर पार्किग, ३०० एकर वर सभा, १०,००० स्वयंसेवक, २५०० पोलीस, ५०० होमगार्ड , ५० खाटांचे दवाखाना 300 डॉक्टर्स 100 हून अधिक प्रसाधनगृह तसेच जागो जागी मोफत पंचर नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली आहे सभेसाठी धुळे-सोलापूर महामार्गावरची वाहतूक तीन ठिकाणी वळविण्यात आली आहे.

सभेसाठी जाणाऱ्या सर्व गाड्याचे टोल माफ
सभेसाठी जाणाऱ्या सर्व गाड्याचे टोल न घेण्याचे मुखमंत्रानी आदेश दिले असल्याचे संतोष बांगर यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितलं.

मराठा सामाज्याची काय आहे मागणी ?
सरसकट मराठा समाजाला कुणबी परवर्गातून ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं अशी मागणी मराठा समाज व मनोज जरांगे पाटील यांची आहे.

मोफत साऊंड सिस्टम आणि पाण्याच्या बॉटल्स
६०० साऊंड सिस्टिम हि बामूरे बंधूनी मोफत सभेसाठी दिली आहे ज्याचे भाडे जवळ जवळ ७ लाख रुपये मिळाले असते, हजारो पाण्याच्या बाटल्या मराठा दानशुर व्यक्ती नि सभे साठी मोफत दिल्या आहेत.

१२३ गावांनी सभेसाठी खर्च उचलला
जालण्यातील १२३ गावांनी सभेसाठी सर्व खर्च उचलला आहे. परुंतु सामन्यवकानी त्यातील काही मोजक्याच गावाकडून मदत घ्यायची ठरवली आहे.

६० मराठा बांधव सभेसाठी उपस्थीत राहण्याची शक्यता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *