रमजान महिन्यात पाणीदार फळांना मागणी जास्त,किमतीत ही वाढ ,वाचा सविस्तर …

रमजान हा मुस्लिम धर्मामध्ये पवित्र महिना असून, या कालावधी मध्ये दिवसभर कडक उपवास केला जातो. त्यात रात्री इफ्तार करून उपवास सोडण्यात येतो . उपवासांमध्ये शरीरातील साखर आणि पाण्याची पातळी वाढत्या उन्हाळ्यात संतुलित ठेवण्यासाठी फळे , खजूर आहारात घेण्याचा रिवाज आहे. त्यामुळे या काळात प्रामुख्याने खरबूज, पपई, द्राक्ष, मोसंबी ,कलिंगड, डाळिंब, संत्री, अशा फळांच्या मागणीमध्ये मोठी वाढ होते. अनेक शेतकरी हा हंगाम साधण्यासाठी कलिंगड, खरबूज लागवडीचे तसे नियोजन करत असतात.

पुणे बाजार समितीतील प्रमुख अडतदार नितीन कुंजीर यांनी  या फळांच्या मागणी आणि दराबाबत माहिती दिली त्यांनी सांगितले कि अनेक शेतकरी रमजान महिन्यातील ही वाढती फळांची मागणी पूर्ण करण्यासाठी नियोजन करत असतात. कारण या महिन्यात अनुभव आहे की दुप्पट आवक होऊनही दर पण २० ते ३० टक्‍क्यांनी वाढत असतात .

द्राक्षांची आवक आणि दर

द्राक्षाचा हंगाम मार्च- एप्रिल दरम्यान अंतिम टप्प्यात आलेला असतो. रमजान सणानिमित्त द्राक्षाला खूप मागणी असते,ती मागणी पूर्ण करण्यासाठी सर्वच व्यापाऱ्यांची धडपड सुरू असते. अनेक व्यापारी यासाठी थेट बागांची खरेदी करण्यावर भर देत असतात असे बाजार समितीतील द्राक्षाचे अडतदार अरविंद मोरे यांनी माहिती दिली . द्राक्षाची आवक पुणे बाजार समितीमध्ये फलटण, तासगाव, इंदापूर, दौंड, बारामती, सोलापूर, बार्शी या भागांतून होत असते. यात शरद सीडलेस, थॉमसन, सुपर सोनाका, जम्बो (काळी) माणिक चमन,या वाणांचा समावेश आहे. या द्राक्ष वाणांना साधारणपणे या कालावधीत प्रति किलोला ४० ते १०० रुपये इतका दर असतो.

…असे आहेत दर (रुपये प्रति किलो)

सुपर सोनाका ५० ते ६०

थॉमसन माणिक चमन ४०-६० रुपये

जम्बो (काळी) ६० ते १००

कलिंगड, खरबुजाची आवक या भागातून होते ..

सोलापूर जिल्ह्यामधील भीमा नदी जवळील भागातील अनेक गावांमध्ये कलिंगड, खरबुजाची लागवड होते. सोबतच इंदापूर, दौंड,नगर, कर्जत, श्रीगोंदा, बारामती अशा काही तालुक्यांमध्येही या पिकांची लागवड केली जाते . साधारणपणे प्रति दिन सरासरी कलिंगडाची ५० ते ६० टन व खरबुजाची ४० ते ५० टन इतकी बाजार मार्केटमध्ये आवक होत असते. रमजान महिन्यामध्ये हीच आवक सरासरीच्या तुलनेत दुप्पट होते .

कलिंगडाचे वाण : वैशिष्ट्ये आणि दर

प्रामुख्याने कलिंगडामध्ये शुगर क्वीन आणि शुगर किंग हे दोन वाण असतात . तर किरण व मॅक्स या दोन वाणांची यामध्ये जास्त आवक होत असते.

शुगर क्वीन आणि किंग हे रसदार, रवाळ वाण आहे तसेच गोडीला चांगले असतात. शुगर क्वीन आणि किंग यांचे दर प्रति किलोला १२ ते १६ रुपये एवढे असतात.. तर बिगर हंगामामध्ये याचे दर ८ ते १० रुपये प्रति किलो एवढे असतात.

मॅक्स या वाणाचा आकार सरासरीच्या आकारापेक्षा मोठा असतो. मॅक्स या वाणाचे दर १५ ते १८ रुपये प्रति किलो एवढा असतो.

लंबगोल आणि आकाराने मोठा किरण हा वाण असतो.हा वाण रवाळ असल्यामुळे मागणी आणि दर चांगले असतात. कलिंगडाला प्रति दर १२ ते १४ रुपये प्रति किलो इतके असतात.

खरबूज वाण : वैशिष्ट्ये आणि दर

खरबुजामध्ये सन, बॉबी कुंदन,हे प्रमुख वाण आहे , तरी त्यामध्ये एकूण आवकेच्या ८० % आवक ही कुंदन वाणाची येत असते . कारण की कुंदनचे फळ गोड, पाणीदार ,सुगंधी आणि असते. परंतु आवक जास्त असल्याने तुलनेने दर कमी असतात. (सरासरी दर – २२ ते ३५ रु. प्रति किलो)

सन : या वाणाचे खरबूज फळ रंगाने पिवळे असते . याच्या आतील गर पांढरा असतो. याची आवक १० टक्के असून, गुणधर्म सरासरी असल्याने मागणी आणि किंमत सारखीच असते . (सरासरी दर – २२ ते ३५ रु. प्रति किलो)

बॉबी : या वाणाचे फळ हिरवट पिवळे असते. सरासरीच्या १० टक्के आवक असून, गोड चवीमुळे आणि टिकाऊपणामुळे दर तुलनेने जास्त असतात. (सरासरी दर – ३५ -४० रु. प्रति किलो)

पपईची आवक आणि दर

साधारण दररोजपपईची ३५ ते ४० टन आवक होत असते. पुणे जिल्‍ह्यासह ही आवक प्रामुख्याने लगतच्या सातारा ,नगर, सोलापूर, जिल्ह्यांतून होते. पपईचा दर १० ते १५ रुपये प्रति किलो अन्य काळामध्ये असला तरी रमजानच्या काळामध्ये पपईला २० ते २५ रुपये प्रति किलो असा चांगला दर मिळत असतो. .

परदेशी फळांची उलाढाल वाढतेय…

उन्हाळ्यामुळे आणि रमजानमुळे फळबाजारामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये परदेशी फळांची आवक होत आहे. शीतसाखळी व शीतगृहे आता परदेशांसह भारतातही व्यवस्थित जपली जात आहे त्यामुळे फळांचा दर्जा शेवटपर्यंत चांगला राहत आहे .

परदेशी फळांमध्ये प्रामुख्याने ड्रॅगन फ्रूट, सफरचंद, पिअर, मोठी द्राक्षे, चेरी,गोड चिंच यांसह विविध फळांना मागणी आहे असे व्यापाऱ्यांनी सांगितले. परदेशांसह भारतातह शीतसाखळी व शीतगृहे व्यवस्थित जपली जात असल्यामुळे फळांचा दर्जा शेवटपर्यंत चांगला टिकतो .बाजारात रविवारी परदेशी फळांची आवक ८० ते १०० टन आणि अन्य दिवशी ४० ते ५० टन इतकी होत आहे अशी माहिती परदेशी फळांचे प्रमुख विक्रेते सलीम बागवान यांनी दिली .

आयात फळे आणि देश

सफरचंद : चिली,न्यूझीलंड, पोलंड, तुर्कस्तान, साऊथ आफ्रिका, अर्जेंटिना, इटली, स्पेन, बेल्जियम, इराण, टर्की, अमेरिका (वॉशिंग्टन),

किवी : इराण, न्यूझीलंड, इटली, ग्रीस, चिली

मोठी द्राक्षे : चिली, अमेरिका

लाल आणि हिरवा पेरू, ब्लू बेरी,पपनस, रबूतान, मँगो स्टीम, ,

ड्रॅगन फ्रूट : व्हिएतनाम

थायलंड

प्लम : इजिप्त, इटली, स्पेन, चिली
पिअर : साऊथ आफ्रिका

रेड चेरी : चिली, ऑस्ट्रेलिया, इराण, अमेरिका

असे असतात दर

प्रकार घाऊक बाजारातील दर (रुपये) किरकोळ बाजारातील

दर (रुपये)

ड्रॅगन फ्रूट १०००-१२०० (२० फळे) २०० (एक किलो)

टर्की सफरचंद २८००- ३४०० (१८ किलो) २०० (एक किलो)

साऊथ आफ्रिका रॉयल गाला ३६००-४००० (१८ किलो) २५०-३०० (एक किलो)

ऑरेंज १२००-१६०० (१५ किलो) १४०-१५० (एक किलो)

मोठी द्राक्षे १५०० (४.५ किलो) ३५०-४०० (एक किलो)

किवी १२००-१५०० (१८ पाकिटे) १०० (तीन फळे)

लिची २६००-२८०० (१० किलो) ३५० (एक किलो)

पिअर १६००-२०००

(१२.५ किलो बॉक्स) १६० (एक किलो)

Leave a Reply