या भागामध्ये अतिवृष्टी होऊन सुद्धा ४० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले नाही, का ते जाणून घ्या सविस्तर ..

कृषी विभागाने यंदाच्या हंगामात विशेष मोहीम राबवली चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यामध्ये २५ हजार हेक्टरवर कापूस, तर १५ हजार हेक्टरवर सोयाबीन असे एकूण चाळीस हजार हेक्टर पिकांवर सोयाबीनची बीबीएफ व बेड पद्धतीने लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले . परिणामी, अतिवृष्टी होऊन सुद्धा या पिकांचे नुकसान झाले नाही. शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग आशेचा किरण ठरला आहे.

सोयाबीन व कापूस ही दोन पिके बीबीएफ आणि बेड पद्धतीने लागवडीची संकल्पना नागपूर विभागीय कृषी सहसंचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी शेतकऱ्यांसमोर मांडली. त्यासाठी वरोरा तालुक्यामध्ये राळेगाव-गुजगव्हाण ४०० , शेगाव (बु.) ३५० शेतकरी, शेतकरी व चिनोरा २५० शेतकऱ्यांना याबाबत प्रशिक्षण व प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन केले.

पारंपरिक लागवड पद्धतीमध्ये जर थोडा बदल केला तर कसा फायदा होतो, हे शेतकऱ्यांना पटवून दिले. त्यामुळे यंदा तालुक्यात प्रशिक्षित शेतकऱ्यांना सोयाबीन १५ हजार हेक्टर आणि कापूस पिकाची २५ हजार हेक्टर क्षेत्रावर बेड पद्धतीने लागवड झाली. अतिवृष्टीचा मोठा फटका पारंपरिक पद्धतीने लागवड केलेल्या पिकांना बसला; परंतु बेड पद्धतीच्या पिकांचे काहीही नुकसान झाले नाही. या प्रयोगसाठी तालुका कृषी अधिकारी सुशांत लव्हटे यांच्या मार्गदर्शनामध्ये शेगाव मंडळ कृषी अधिकारी विजय काळे व कृषी विभागाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

1. बेड पद्धत
बेड मेकरने बेड तयार करून त्यावर डिबलर यंत्र अथवा हाताने सोयाबीन अथवा कपाशीची लागवड करण्यात येते . थेट मुळाखाली पाणी साचत नाही या पद्धतीमध्ये, हवा तिथे खेळती राहण्यास मदत होते . जाेमदार वाढ होऊन पीक निरोगी राहते . बेडवर लागवड केलेल्या क्षेत्रामध्ये पावसाने नुकसान आढळून आले नाही. रुंद वरंबा सरी पद्धत या पद्धतीला , असेही म्हटले जाते.

2. बीबीएफ पद्धत
बीबीएफ हे पेरणीयंत्र आहे. या यंत्रा व्दारे चार ओळींमध्ये पेरणी केली जाते . व्ही. आकाराचे पास दोन बाजूने लावले जाते. या द्वारे झाडाच्या बाजूने नाली तयार होऊन पेरणी उंचावर येते. त्यामुळे अतिवृष्टी झाली तरी झाडाचे नुकसान होत नाही. नालीमध्ये साचलेल्या पाण्याने ओलावा मिळत राहतो. पारंपरिक लागवड पद्धतीत पावसाचे पाणी साचून पिके पाण्याखाली येतात.

खरीप हंगामापूर्वी शेगाव बु. येथे प्रशिक्षण घेण्यात आले . यावर्षी पारंपरिक पद्धतीने लागवड न करता बेडवर चार एकरावर सोयाबीन लागवड अष्टसूत्री पद्धतीने केली. पिकाची वाढ अतिवृष्टीतही चांगली झाली. अतिवृष्टीतही पीक वाचले. त्यामुळे एकरी उत्पादनामध्ये चार ते पाच क्विंटल वाढ होण्याची आशा आहे. नथ्थू तिखट, शेतकरी, धानोली

Leave a Reply