Disease control : कोंबडीमधील ओम्फायलायटीस आजाराचे नियंत्रण कसे करावे ,जाणून घ्या सविस्तर …

नवजात कोंबड्यांच्या पिल्ल्यांना जडणारा जिवाणूजन्य आजार हा ओम्फायलायटीस (मशी आजार ) आहे. नवजात पिल्ल्यांच्या नाभीवर या आजारात सूज येते. वयाच्या पहिल्या आठवड्यात या आजारामुळे नवजात पिल्लांत सर्वाधिक मृत्यू होतात. पाच ते दहा टक्के मृत्यूदर असून कधी कधी तो 100% पर्यंत सुद्धा पोहोचतो.

कारण

– जन्माच्या वेळी नाभी पूर्ण बंद न झाल्याने नाभीमध्ये क्लोस्ट्रीडिया, प्रोटीअस, सुडोमोना, बेसिलस सिरस,
स्टेफायलोकोकस आणि इ.कोलाय जिवाणूचा संसर्ग होऊन आजार होतो.
– पिल्ले अंड्यातून बाहेर येते वेळी किंवा त्यानंतर जिवाणूसंसर्ग लगेच होतो.
– हा आजार हॅचरीमध्ये पिल्ले अंड्यातून बाहेर येतेवेळी नाभी पूर्णपणे कोरडी न झाल्यास जडण्याची शक्यता
वाढते.
– हॅचरीत नाभी सुकणे ही प्रक्रिया उष्मायान आणि स्फुटन यंत्राचे तापमान आणि त्यातील आर्द्रता यांवर
अवलंबून असते.
– अंडी स्फुटन होत असताना स्फुटन यंत्राचे तापमान योग्य नसणे, स्फुटन यंत्रात अस्वच्छता असणे, आणि
अंड्यांच्या उष्मायान कालावधीत उचित तापमान वाढल्याने हा आजार होण्याची शक्यता आहे.
– हॅचरीमध्ये उपकरणांचे नियमितपणे निर्जतुकीकरण न केल्यास आजार होण्याची शक्यता आहे.
– पिल्ल्यांनामध्ये स्फुटन प्रक्रिया होताना अंडी फुटल्यास जीवाणूसंसर्ग होतो.

प्रसार
– या आजाराचा प्रसार हॅचरीमध्ये पिल्ले अंड्यातून बाहेर येतेवेळी नाभी पूर्णपणे कोरडी न झाल्यास होतो.
– जिवाणू संक्रमण हे स्फुटन करण्यासाठी अंडी स्वच्छ असल्यास, पिल्ल्यांना अस्वच्छ डब्यात ठेवल्यास
आणि अंडी कवच निर्धारित गुणवत्तेचे नसल्याने होऊ शकते 
– जिवाणूसंसगाचा महत्त्वाचा स्त्रोत हा अंडी कोंबड्यांच्या मलमूत्राने दूषित झाल्याने ठरतो. जिवाणूचे बहुलीकरण
दूषित अंड्यात अतिशय वेगाने होऊन ते नवजत पिल्लांमध्ये संक्रमण होतात.
– संक्रमणांचा स्त्रोत्र हे बाधित पिल्ले इतर पिल्लांसाठी ठरतात.

लक्षणे
– नवजात पिल्लांच्या नाभी आणि पोटावर सुजन पोटाचा आकार वाढू लागतो.
– आंत्रावरणाचा संसर्गजन्य दाह होतो.
– पोटामध्ये काळसर किंवा निळसर पाणी जमा होणे
– अंड्याच्या पिवळ्या बालकाची पिशवी नवजात पिल्लांच्या पोटात असते. ती काही ठराविक कालावधीत सुकून
जाते. परंतु ती पिशवी या आजारात न सुकता, दाह उत्पन्न होऊन सुजते.
– पिल्ल्यांना नैराश्य येते व ते मान खाली टाकतात आणि ते सुस्त दिसतात.
– खाद्य खाने आणि पाणी पिणे त्यांचे कमी होते.
– गुदद्वार विष्ठेने बंद होऊन पिल्लांना हगवण लागते व त्यांची वाट खुटते.
– 24 तासात बाधित पिल्लाचा मृत्यू होतो.

निदान
– पिलल्लाचे लक्षणे, वय आणि उत्तरीय तपासणीमध्ये दिसलेल्या लक्षणाद्वारे करता येते. आजाराचे निदान प्रयोगशाळेत
जिवाणू विलगीकरण करून करता येते.

उपचार
– पिण्याच्या पाण्यातून पाच दिवस योग्य प्रतिजैविक आणि इलेकट्रोलाईट ही आजाराची लक्षणे दाखविणाऱ्या गटातील
पिल्लांना द्यावे.
– पशुवैद्यकाचा सल्ला हा मात्रा, प्रतिजैविकाचा प्रकार आणि मंत्राचा कालावधी याबाबत घ्यावा.
– प्रतिजैविक संवेदनशीलता चाचणी ही प्रतिजैविका चा वापर करण्याआधी करावी. आजार बाळवण्याची शक्यता ही
चुकीच्या प्रतिजैविकामुळे होते.

प्रतिबंधात्मक उपाय
– पिल्ले विकत घेताना हचेरी ची स्वच्छता आणि उपकरणाची नियमित निर्जुतकीकरण बघावे.
– ब्रूडरची स्वच्छता व्यवस्थित करून व त्यावर जीवा जीवाणूनाशक औषध फवारावे.
– मरतुक झालेल्या पिल्लांना तात्काळ बाहेर काढून व त्यांना जाऊन किंवा होल खड्ड्यात पुरून नष्ट करावे.
– खेळती हवा शेडमध्ये असावी.
– पिल्ल्यांची गर्दी होईल इतक्या जास्त संख्येने ठेवून नयेत.
– पिल्ल्यांना अधिक उष्णता आणि थंडीपासून अलिप्त ठेवावे.
– पिण्याचे पाणी स्वच्छ व नितळ आणि ताजे पिल्लांसाठी असावे.
– क्लोरीनचा वापर पाणी निर्जंतुकीकरणासाठी करावा.
– अंड्याचा साठा हॅचरीमध्ये चांगल्या प्रकारे करावा.
– अंडी स्फुटन झाल्यानंतर अशक्त आणि मलूल पिल्लांना लगेच वेगळे करून नष्ट करावे.
– उबवणसाठी फुटलेली आणि असंच अंडी ठेवू नयेत.
– प्यारेट फ्लकच्या आरोग्याची तपासणी ही नवजात पिलांची मरतूक तीन टक्के पेक्षा जास्त होत असेल तर करावी.
हॅचरी मधील नियमित प्रक्रियांचे निरीक्षण करून समीक्षा करावी. नवजात पिल्लांच्या व्यवस्थापनात निष्काळजीपणा करू नये.
– गादी पुरेशी गरम असल्याची खात्री करून मग त्या गादीवर पिल्ले सोडा .
– प्रत्येक स्फुटनानंतर अंडी उबवणूक यंत्र निजतुक करावे.
– उबवणूक यंत्राचे छिद्र निर्जतुकी करण्यासाठी धुरीकरण प्रक्रिया वापरत असल्यास बंद करावे.
– 50 मिली फॉर्मलदिहा (४० टक्के) किंवा प्यारा फॉर्मलदिहाइडमध्ये 22 ग्रॅम पोटॅशियम परमॅगनेट हा धुरीकरण्यासाठी प्रत्येक चौरस
मीटर जागेसाठी वापर करावा. त्या औषधां पासून कामगारांना इजा होणार नाही याची दक्षता वापरताना घ्यावी.
– निर्जतुकीकरण केलेले यंत्र दूषित होण्यास वेळ लागण्याचं कारण म्हणजे यंत्राचे बाहेरील आवरण आणि हाचेरीतील वातावरण दूषित
होणे. संपूर्ण खोलीचे निर्जतुकीकरण करण्यासोबतच उबवणूक करणे उपयुक्त ठरते.

Leave a Reply