महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. महिलांना दर महिन्याला १५०० रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात. याचबरोबर या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिलांना ३ गॅस सिलिंडर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत मिळणार आहे.
महिलांना वर्षभरात तीन सिलिंडर महाराष्ट्र सरकारच्या या योजनेअंतर्गत मोफत दिले जाणार आहेत.आता या मोफत सिलिंडर वितरणाला सुरुवात झाली आहे. मेसेज आल्यानंतरच पात्र महिलांना मोफत सिलिंडर मिळणार आहे. ज्या महिलांना या योजनेअंतर्गत मेसेज आला नाही त्यांनी काय करावे याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
महिलांना तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली होती. ज्या महिलांना मोफत गॅस सिलिंडर आतापर्यंत मिळाला नाही. त्यांना आता गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे. गॅस सिलिंडर वितरण प्रक्रिया सुरु केलेली आहे. त्यामध्ये अगोदर महिलांना गॅस सिलिंडर विकत घ्यायचा आहे. त्यानंतर महिलांच्या खात्यात गॅस सिलिंडरची रक्कम देण्यात येणार आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलिंडरचा हप्ता जमा झालेला आहे. या योजनेत ज्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. त्यांनी गॅस एजन्सीमध्ये जाऊन ई केवायसी करुन घेणे गरजेचे आहे . त्यानंतरच तुम्हाला गॅस सिलिंडरचे पैसे मिळणार आहेत.